Apurva Nemlekar: लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचं कमबॅक, हॉरर सीरिजच्या प्रोमोची जोरदार चर्चा

मुंबई: लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयातील वेगळेपणामुळे आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांमुळे ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः तिने साकारलेली 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता' ही भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. दरम्यान, अपूर्वानं अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्टची झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्या व्हिडिओतील तिचा लूक पाहून अनेकांना ‘शेवंता’ची आठवण झाली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत अपूर्वानं ‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज 'एआय'वर आधारित असून तिची प्रस्तुतीदेखील अपूर्वानं स्वतः केली आहे.



“काहीतरी वेगळं, अंतर्मुख आणि सिनेमॅटिक करायचं होतं” – अपूर्वा नेमळेकर


‘एआय’ आधारित सीरिज करण्यामागील कल्पनेविषयी बोलताना अपूर्वा म्हणाली, “आजच्या काळात कंटेंटची कमतरता नाही, पण त्यातही आम्हाला काहीतरी वेगळं, अंतर्मुख करणारं आणि सिनेमॅटिक सादरीकरण करायचं होतं. एआयच्या मदतीनं आम्हाला कल्पनेच्या पलीकडचं व्हिज्युअल स्टोरीटेलिंग साकारता आलं. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर लोककथा, भीती आणि वास्तव यांचा संगम घडवून ही कथा एका नवीन पद्धतीनं मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर कथाकथनाला एका नव्या स्तरावर नेण्याची संधी आहे. आम्ही काहीतरी वेगळं निर्माण करत आहोत, जे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल.”



सामाजिक आशय असलेली थरारक भयकथा


‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजमधील प्रत्येक भागात वेगवेगळ्या घटनांभोवती फिरणारं कथानक उलगडताना दिसणार आहे. पाऊस, वारा, शांतता अशा विविध वातावरणांमध्ये कथा पुढे सरकते, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. ही सीरिज फक्त भीती निर्माण करणारी नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी आहे, असं अपूर्वा स्पष्ट करते. ती पुढे म्हणाली, “या कथेत अन्याय आणि त्या अन्यायाशी जोडलेल्या आठवणींचं प्रतिबिंब आहे. ‘पद्मिनी’ ही एक शक्ती आहे, जी विस्मरणात गेलेलं सत्य पुन्हा समोर आणते. न्याय विरुद्ध सूड, सामर्थ्य विरुद्ध असुरक्षितता असे अनेक स्तर या कथेत आहेत. ही केवळ भयकथा नसून ती एक सामाजिक भाष्य आहे. कथानकात अनेक रहस्यमय आणि अनपेक्षित वळणं आहेत, जी प्रत्येक भागागणिक उलगडत जातील. सत्ता, अन्याय आणि सत्य यावर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत