Indian Flag : पाण्याखाली फडकवला जगातील सर्वात मोठा भारतीय तिरंगा

अंदमान - निकोबार बेटे : अंदमान आणि निकोबार बेटांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. येथील स्वराज द्वीप (पूर्वीचे हॅवलॉक आयलंड) येथे समुद्राच्या पाण्याखाली भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकवून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.


पाण्याखाली प्रदर्शित करण्यात आलेला हा विशाल तिरंगा ६० मीटर लांब आणि ४० मीटर रुंद होता. या मोहिमेत वन विभाग, मरीन पोलीस आणि खाजगी संस्थांमधील तज्ज्ञ पोहणाऱ्यांसह सुमारे २०० डायव्हर्सनी सहभाग घेतला होता. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा तिरंगा समुद्राच्या तळाशी फडकवण्यात आला.


विशेष म्हणजे, अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) देवेंद्र कुमार जोशी यांनी स्वतः डायव्हिंग टीमचा भाग बनून या मोहिमेत सहभाग नोंदवला.


अंदमानला जागतिक स्तरावर 'डायव्हिंग डेस्टिनेशन' म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हा प्रयत्न केला असल्याचे पर्यटन संचालक विनायक चमडिया यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे बेटावरील वैशिष्ट्यपूर्ण सागरी परिसंस्था, संवर्धन प्रयत्न आणि साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.


या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अंदमानच्या पर्यटनाला मोठी प्रसिद्धी मिळण्याची आणि जगभरातील डायव्हर्सना आकर्षित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील लक्ष्य : 'टॅलेस्ट ह्युमन स्टॅक'या विक्रमानंतर प्रशासन रविवारी आणखी एका विक्रमासाठी सज्ज झाले आहे. स्वराज द्वीप जेटीजवळील लाइट हाऊस परिसरात पाण्याखाली किमान १० मीटर उंचीचा 'सर्वात उंच मानवी मनोरा' उभारून दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

Comments
Add Comment

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या चार दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष उसळला; लष्करी नियंत्रणाविरोधात ‘संयुक्त आवामी कृती समिती’चे मोठ्या आंदोलनाचे आवाहन

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरोधात तेथील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे.