विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. या मोहिमेचे पहिले मानवरहित उड्डाण 2026 च्या चौथ्या तिमाहीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Space Mission)
गगनयान मोहिमेसाठी मानवी अंतराळ प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. ह्यूमन रेटेड लॉन्च व्हेईकल (HLVM3), ऑर्बिटल मॉड्यूल, क्रू मॉड्यूल, सर्व्हिस मॉड्यूल, लाइफ सपोर्ट सिस्टीम, थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम, क्रू एस्केप सिस्टीम आणि इतर महत्त्वाच्या यंत्रणांची चाचणी यशस्वी झाली आहे. तसेच या मोहिमेसाठी आवश्यक नियंत्रण केंद्र, प्रशिक्षण सुविधा आणि इतर पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. (Gaganyaan)
Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी ...
इस्रोने आतापर्यंत TV-D1 मोहिमेद्वारे क्रू एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी केली आहे. तसेच IADT-01 आणि IADT-02 चाचण्यांमध्ये क्रू मॉड्यूलच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक प्रणालींची पडताळणी करण्यात आली. आता TV-D2 चाचणी मोहिमेची तयारी सुरू आहे. (Science News)
2026 मध्ये होणाऱ्या पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेत 'व्योममित्र' हा ह्युमनॉइड रोबोट अंतराळात पाठवला जाणार आहे. या मोहिमेत नवीन लाइफ सपोर्ट सिस्टीम आणि इतर तांत्रिक प्रणालींची चाचणी घेतली जाईल. 2027 पर्यंत दोन मानवरहित मोहिमा पूर्ण केल्यानंतर पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवण्याचा इस्रोचा मानस आहे. (Space Technology)
याशिवाय, 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या स्थानकात एकूण 5 मॉड्यूल असतील. पहिल्या BAS-01 मॉड्यूलच्या विकास आणि प्रक्षेपणाला आधीच मंजुरी देण्यात आली असून, त्यावर इस्रोच्या विविध केंद्रांमध्ये काम सुरू आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान, भारतीय अंतराळ स्थानक आणि इतर मिळून 8 अंतराळ मोहिमांसाठी 20,193 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. या प्रकल्पांमध्ये इस्रो युरोपियन स्पेस एजन्सी (ESA), ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी, फ्रान्सची CNES आणि रशियाची रोस्कोस्मोस या संस्थांशीही सहकार्य करत आहे. (India News)