'वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, त्याचठिकणी'...; शेवटची इच्छा व्यक्त करत माय-लेकीचं टोकाचं पाऊल

नागपूर : आज अनेक कुटुंबामध्ये संपत्तीचा वाद सर्रास पहायला मिळतो. या कारणातून अनेक हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. नागपूर शहरातून देखील अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून माय-लेकीने आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून नात्यातील क्रूरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Nagpur Crime )


नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) अशी मृत महिलांची नावं आहेत. त्या दोघीही घरात एकत्र राहत होत्या. रात्रीच्या सुमारास या दोघींनीही आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्यांनी आपला अंत्यसंस्कार गावाकडे त्याच ठिकाणी करावेत जिथे आकांक्षाच्या वडिलांचा अंत्यसंस्कार झाले होते, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, सुसाईड नोटमध्ये सासरच्या लोकांबद्दल असलेला तिरस्कार आणि दुःख स्पष्टपणे दिसून येत असून त्यांनी आपले पार्थिव सासरच्यांच्या ताब्यात न देण्याची विनंती केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हेचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. काही महिन्यांपूर्वीच तिला मुलगी झाली होती. मात्र, दुर्दैवाने त्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आकांक्षा आपल्या आईच्या घरी राहायला आली होती. या काळात आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे हा शेती, घर आणि इतर मालमत्तेसाठी आपली पत्नी आणि सासू यांच्याशी सातत्याने वाद घालत होता. आकांक्षा बँकेत नोकरी करत होती आणि तिची आई देखील नोकरीला होती, तर आकांक्षाच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. 30 एप्रिलच्या रात्री लोकेश त्यांच्या घरी आला होता आणि मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला, ज्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन माय-लेकीने दुकानातून दोरी आणली आणि मृत्यूला कवटाळले. (Nagpur Crime )


या आत्महत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आणि सुसाईड नोटमधील मजकुरावरून पोलिसांना जावई लोकेश ब्रम्हे याच्यावरच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे.


पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. मालमत्तेच्या वादातून एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी लोकेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस लवकरच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवत अमेरिकेत दाखल; न्यूयॉर्कमध्ये ५ हजार जणांच्या मेळाव्याला करणार संबोधन

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दाखल झाले.

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी