Friday, May 1, 2026

Arjun Tendulkar आयपीएल मधून OUT ! बीसीसीआयकडून मिळाली परवानगी, दुसऱ्या लीग मध्ये खेळणार,नेमकं चाललंय काय ?

Arjun Tendulkar आयपीएल मधून OUT ! बीसीसीआयकडून मिळाली परवानगी, दुसऱ्या लीग मध्ये खेळणार,नेमकं चाललंय काय ?

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या खेळामुळे अनेकदा चर्चेत असतो. मात्र सध्या लखनऊकडून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे. यात आता बातमी येत आहे की तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे .भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्जुनला आयपीएल दरम्यान दुसऱ्या लीग मध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. अर्जुन तेंडुलकर टी 20 मुंबई लीगच्या चौथ्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावासठी पात्र झाला आहे.

अ़र्जुन गोव्याकडून रणजी क्रिकेट खेळतो. लवकरच तो टी-२० मुंबई लीग 2026 मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. टी-२० मुंबई लीग 2026 ची सुरुवात जून 2026 पासून होणार आहे.

मुंबईकडून टी-२० खेळण्याची संधी

बीसीसीआयने अर्जुन तेंडुलकराला मुंबई टी २० लीग मध्ये खेळण्याची संधी दिली आहे, मात्र अर्जुन रणजी आणि देशांतर्गत क्रिकेट गोव्यासाठी खेळतो. वर्षभरात अर्जुन इतर कोणत्याही राज्यासाठी क्रिकेट खेळलेला नाही. तसेच त्याने कोणत्याही राज्याच्या टी 20 लीगमध्ये भाग घेतलेला नाही.

बीसीसीआयच्या नियमांनुसार,खेळाडूंवर अतिरिक्त शारीरिक ताण येऊ नये आणि त्यांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी सलग १२ महिन्यांच्या काळात फक्त एकाच बीसीसीआयची मान्यता असलेल्या टी 20 लीगमध्ये भारतीय नागरिक असलेले क्रिकेटपटू खेळू शकतात. उदाहरणार्थ,जर एखाद्या खेळाडूने ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपलेल्या राज्य संघाच्या टी २० स्पर्धेत भाग घेतला असेल,तर त्याला १ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुसऱ्या कोणत्याही राज्य संघाच्या टी २० लीग मध्ये खेळता य़ेणार नाही. या नियमाचा विचार केला तरी अर्जुन मुंबई टी 20 लीग खेळू शकतो असे लक्षात आले. यानंतर त्याला आयपीएलमधून मुक्त करून मुंबई टी 20 लीग खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई टी 20 लीगसाठी पुरूष आणि महिला अशा दोन्ही गटांच्या खेळाडूंचा लिलाव २ मे रोजी होणार आहे. नंतर मुंबई टी 20 लीग जूनच्या पहिल्या आठवड्या पासून सुरू होणार आहे .

Comments
Add Comment