West Bengal Election 2026 : ऐतिहासिक मतदान; दोन टप्प्यांत तब्बल ९२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व मतदानाचा कल दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातही जवळपास ९२ टक्के मतदान नोंदवले गेले. यामुळे दोन्ही टप्प्यांचा एकूण सरासरी मतदानाचा दर ९२.६३ टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, हा देशातील कोणत्याही राज्यासाठी आतापर्यंतचा नवा विक्रम मानला जात आहे.


राज्यात आज, बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. यानंतर दोन्ही टप्प्यांचा मिळून एकूण मतदानाचा दर ९२.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये कधीही मतदान ८४.७२ टक्क्यांपेक्षा जास्त झाले नव्हते. त्यामुळे यंदाची निवडणूक राज्याच्या निवडणूक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.देशपातळीवर पाहता, हा मतदानाचा दर आतापर्यंतचा सर्वोच्च मानला जात आहे. यापूर्वी हा विक्रम त्रिपुराकडे होता, जिथे २०१३ मध्ये ९१.८२ टक्के मतदान नोंदवले गेले होते. मात्र पश्चिम बंगालने हा विक्रम यंदा मोडीत काढला आहे.



मागील निवडणुकांपेक्षा मोठी वाढ :


">राज्यात २०२१ च्या निवडणुकीत ८ टप्प्यांत मतदान झाले होते आणि एकूण मतदानाचा दर ८२.१७ टक्के होता. त्या तुलनेत यंदा केवळ दोन टप्प्यांतच मतदान पूर्ण झाले असून मतदानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तर २०२१ मध्ये संबंधित मतदारसंघांमध्ये मतदान अनुक्रमे ८३.१८ टक्के आणि ८१.०८ टक्के होते. त्याच्या तुलनेत २०२६ मध्ये याच भागात मतदान ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे.



मतदानाचा ऐतिहासिक प्रवास :


पश्चिम बंगालमध्ये याआधी सर्वाधिक मतदान २०११ मध्ये ८४.३३ टक्के झाले होते. त्याच निवडणुकीनंतर राज्यात राजकीय सत्ता बदल झाला होता. याशिवाय १९९६ आणि २००६ मध्येही मतदान ८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले होते. मात्र २०२६ मध्ये हा सर्व रेकॉर्ड मोडला गेला आहे.



मतदारसंख्या आणि सहभागात वाढ :


राज्यात २०२१ मध्ये ७.३४ कोटी मतदार नोंदणीकृत होते, त्यापैकी ६.०३ कोटी मतदारांनी मतदान केले होते. २०२६ मध्ये विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) नंतर ६.८२ कोटी मतदार नोंदणीकृत झाले असून त्यापैकी ६.२५ कोटींहून अधिकांनी मतदान केले आहे. त्यामुळे मतदार सहभागातही वाढ दिसून आली आहे.

Tags
west bengalelection 2026bjpwest bengal electionMore than 92 percent voting
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण