West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, एक्झिट पोलचा अंदाज

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यामुळे ममता बॅनर्जी सत्ता राखणार की भाजपची सत्ता येणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार आहे.


प्रजा पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप १७८ ते २०८ जागा जिंकेल तर पोल डायरीच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप १४२ ते १७१ जागांवर बाजी मारेल. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पार्टी १४६ ते १६१ जागांवर विजयी होईल. चाणक्य स्टॅटेजीझच्या एक्झिट पोलने भाजप १५० ते १६० जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालबाबतच्या जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १५० ते १८० जागा जिंकता येतील. तसेच पीएमएआरक्यूच्या पश्चिम बंगालबाबतच्या एक्झिट पोलनुसार भाजप १५० ते १७५ जागा जिंकेल.


पश्चिम बंगालच्या विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. यामुळे १४७ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकल्यास स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजप सत्ता स्थापन करू शकेल. एक्झिट पोलचे अंदाज पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमत मिळवेल असाच अंदाज व्यक्त करत आहेत.



पश्चिम बंगालमधील सध्याची स्थिती


पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. २९४ पैकी २२१ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसने २०२१ मध्ये राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपने २०२१ च्या निवडणुकीत ६५ जागांवर विजय मिळवला होता. ही पश्चिम बंगालमधील भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.



मतदानाची वेळ संपल्यानंतर कोण करू शकते मतदान ?


पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपले आहे. नियमानुसार संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. आता जे मतदार रांगेत असतील फक्त त्यांनाच मतदान करता येईल. नव्याने कोणालाही मतदानासाठी रांगेत उभे राहण्याची परवानगी नसेल. यासाठी संबंधित मतदान केंद्रातले निवडणूक अधिकारी शेवटच्या मतदाराची नोंद करून ठेवतील, त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात शेवटच्या मतदाराने हक्क बजावेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण