Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाने विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने पाच नावांची चाचपणी सुरू केली असून, यामुळे विधान परिषदेची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विचारात न घेता परस्पर अंबादास अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ठाकरे स्वतः रिंगणात असतील तर त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला जाईल; मात्र अन्य कोणाचे नाव आल्यास काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार देईल. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पाच जणांची नावे चर्चेत असली, तरी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि राजकीय वजन पाहता त्यांना संधी देऊन उबाठाला प्रत्युत्तर देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. याशिवाय सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचीही नावे पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहेत.


शरद पवार गटाची भूमिका काय?


एकीकडे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र उबाठाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, राज्यसभेवेळी आम्ही विधानसभेला उबाठाचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे विधानपरिषेदत असावे, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर, रोमँटिक अंदाजात माफी मागणं पडलं महागात, पुढे घडलं असं काही की...

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Basuri Swaraj : ‘पितृसत्ता मोडून काढा’ म्हणणाऱ्या राहुल गांधींवर बासुरी स्वराज संतापल्या

नवी दिल्ली : अभिनेत्री कृती सॅनॉनच्या रक्षाबंधन विशेष दागिन्यांच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता थेट

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये