पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व मतदानाचा कल दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातही जवळपास ९२ टक्के मतदान नोंदवले गेले. यामुळे दोन्ही टप्प्यांचा एकूण सरासरी मतदानाचा दर ९२.६३ टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, हा देशातील कोणत्याही राज्यासाठी आतापर्यंतचा नवा विक्रम मानला जात आहे.
राज्यात आज, बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. यानंतर दोन्ही टप्प्यांचा मिळून एकूण मतदानाचा दर ९२.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये कधीही मतदान ८४.७२ टक्क्यांपेक्षा जास्त झाले नव्हते. त्यामुळे यंदाची निवडणूक राज्याच्या निवडणूक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.देशपातळीवर पाहता, हा मतदानाचा दर आतापर्यंतचा सर्वोच्च मानला जात आहे. यापूर्वी हा विक्रम त्रिपुराकडे होता, जिथे २०१३ मध्ये ९१.८२ टक्के मतदान नोंदवले गेले होते. मात्र पश्चिम बंगालने हा विक्रम यंदा मोडीत काढला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ९० ...
मागील निवडणुकांपेक्षा मोठी वाढ :
मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील ...







