Breaking News : धक्कादायक! RSS मुख्यालयाला ‘रेडिओॲक्टिव्ह’ धमकी; नागपुरात खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूरमधील महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणाऱ्या निनावी पत्रामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हे पत्र नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आले होते. पत्रात ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेचा उल्लेख करण्यात आला असून संघाविरोधात आक्षेपार्ह भाषाही वापरण्यात आली आहे.



‘सिझीयम-137’ टाकल्याचा दावा :


इंग्रजीतील या पत्रात RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर आणि मेट्रो परिसरात ‘सिझीयम-137’ नावाची रेडिओॲक्टिव्ह पावडर टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. हा पदार्थ अत्यंत धोकादायक असून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. पत्र मिळताच पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांनी तातडीने संबंधित परिसराची तपासणी केली. सध्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.



‘सिझीयम-137’ नेमकं काय?


‘सिझीयम-137’ हा एक रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप असून तो नैसर्गिकरित्या आढळत नाही. अणुभट्ट्या किंवा अण्वस्त्रांमध्ये युरेनियमच्या विभाजन प्रक्रियेतून हा पदार्थ तयार होतो. याचे अर्धायुष्य सुमारे ३० वर्षे असून तो बीटा कण आणि शक्तिशाली गामा किरण उत्सर्जित करतो.



किती धोकादायक आहे हा पदार्थ?


सिझीयम-137 च्या संपर्कात आल्यास गंभीर किरणोत्सर्गजन्य आजार होऊ शकतात. त्वचेवर भाजल्यासारखी लक्षणे, तसेच जास्त प्रमाणात संपर्क आल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. हा पदार्थ पाण्यात सहज मिसळतो, त्यामुळे तो वातावरणात जलद पसरू शकतो. मानवी शरीरात गेल्यास तो पोटॅशियमप्रमाणे स्नायूंमध्ये साठू शकतो, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.



कडक सुरक्षा व्यवस्था :


RSS मुख्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडे असून सुमारे १५० जवान येथे तैनात आहेत. डेप्युटी कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली २४ तास सुरक्षा ठेवली जाते. याशिवाय नागपूर पोलिस बाहेरील सुरक्षा पाहतात आणि आवश्यकतेनुसार इतर केंद्रीय दलांची मदत घेतली जाते. या घटनेनंतर नागपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या