पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि प्रखर प्रकाशझोताबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक व्यवस्थेतील ‘प्लाझ्मा साऊंड’ तसेच प्रखर लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला.गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाषाण रस्त्यावरील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केले.
क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा रातोरात ...
ध्वनिक्षेपकाचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. ध्वनीप्रदूषणाबरोबरच नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रखर प्रकाशझोतांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांना ध्वनी आणि प्रकाशप्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.