एआय धोरणातून दीड लाख रोजगार, तर लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावे अध्यासन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; हरित महाराष्ट्र आयोग आणि दिव्यांग शिष्यवृत्तीत मोठी वाढ


मुंबई : तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत राज्याचे स्थान बळकट करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी 'महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण २०२६' ला मंजुरी दिली. या धोरणाद्वारे राज्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि सुमारे दीड लाख नवीन रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक समतेचा विचार सातासमुद्रापार नेण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कायमस्वरूपी अध्यासन सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णयही यावेळी घेण्यात आला.



एआय धोरणांतर्गत राज्यात पाच 'एआय इनोव्हेशन सिटीज' आणि सहा 'एआय उत्कृष्टता केंद्रे' स्थापन केली जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर या धोरणात विशेष भर देण्यात आला आहे. सामाजिक समता व समरसता वर्षाचे औचित्य साधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना केली जाईल. या माध्यमातून डॉक्टरेटसाठी (पीएचडी) विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार असून, भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचे विचार जागतिक व्यासपीठावर अभ्यासले जातील.



राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 'हरित महाराष्ट्र आयोगा'ची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल. ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेच्या मदतीने 'मॅजेस्टिक' ही हरित ऊर्जा साठवणूक आणि पारेषण क्षमता वाढवणारी योजना राबवण्यात येणार आहे.



दिव्यांग आणि आदिवासी कर्मचाऱ्यांना दिलासा


गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत सरकारने मोठी वाढ केली आहे. आता उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण, ग्रंथालय आणि वैद्यकीय तपासणीचे सर्व शुल्क सरकारतर्फे दिले जाईल. तसेच, अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ आणि २४ वर्षांच्या सेवेनंतरची 'सुधारित आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रतीक्षा संपणार आहे.



कोकणात केंद्रीय विद्यालय


रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे नवीन केंद्रीय विद्यालयाच्या उभारणीसाठी अडीच हेक्टर जमीन केंद्र सरकारला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान