मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हातकणंगले तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने सहाध्यायी युवतीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार करून मित्रांमध्ये शेअर केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी शाहीद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली) याला अटक करण्यात आली असून पीडितेने राजारामपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला हातकणंगले पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलीस निरीक्षक शरद मेमाण यांनी आरोपीला पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
- सरकारचा अंतिम निर्णय मात्र प्रतीक्षेत मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावर सध्या मोठी घडामोड समोर आली आहे. ...
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असेही समोर आले आहे की, आरोपीचे एका महाविद्यालयीन युवतीसोबत प्रेमसंबंध होते. विश्वास संपादन करून त्याने या नात्याचा गैरफायदा घेत अत्याचार केला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या साथीदाराने संबंधित व्हिडिओ तयार करून ते मित्रपरिवारात शेअर केले. इतकेच नव्हे, तर पीडितेला आणि तिच्या काही मैत्रिणींनाही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आठ ते दहा मुलींचे व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची रशियाच्या दौऱ्यावर मॉस्को येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान रशियाकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. ...
या घटनेनंतर हातकणंगले परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध पक्षांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. २८ एप्रिल रोजी शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असून, या घटनेविरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलनांची तयारी सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.
पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू असून, डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.






