Monday, April 27, 2026

White House Dinner Firing : व्हाइट हाउसच्या प्रेस सचिवांच्या ‘आज रात्री गोळ्या चालतील’ वक्तव्यानंतर गोळीबार, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

White House Dinner Firing : व्हाइट हाउसच्या प्रेस सचिवांच्या ‘आज रात्री गोळ्या चालतील’ वक्तव्यानंतर गोळीबार, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाइट हाउस संवाददाता डिनरदरम्यान अचानक गोळीबाराची घटना घडताच मोठा गोंधळ उडाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी वेगाने कारवाई करत डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. अधिकाऱ्यांनी नंतर पुष्टी केली की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.या संपूर्ण घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांचे एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.

कॅरोलिन लेव्हिट यांनी एका पत्रकाराशी बोलताना विनोदाने म्हटले होते की, “आज रात्री गोळ्या चालणार आहेत.” लेव्हिट यांनी यावर भर दिला होता की राष्ट्राध्यक्षांचे भाषण अगदी क्लासिक शैलीतील असेल. आता लोक या वक्तव्याचा संबंध घटनेशी जोडून पाहत आहेत आणि सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठीही तयारी सुरू होती आणि प्रेक्षकांना दूरदर्शनवर कव्हरेज पाहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण वातावरण बदलून गेले आणि कार्यक्रमाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ही घटना आता चौकशीच्या कक्षेत आली असून, इतक्या कडेकोट सुरक्षेनंतरही हल्लेखोर आतपर्यंत कसा पोहोचला किंवा हल्ल्याचा प्रयत्न कसा झाला, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >