 |
साहसी व पराक्रमी वृत्तीत वृद्धि होईल
मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणी च्या विकासासह साहसी व पराक्रमी वृत्तीत वृद्धि होईल. कुटुंब परिवारा मध्ये एकीची भावना दृढ होऊन भावंडांमध्ये वाढते सहकार्य असेल कुटुंबात महत्त्वाच्या घडामोडी. आर्थिक लाभ मिळू शकतो. कार्य ओळखीच्या माध्यमातून पूर्ण होऊन लाभप्रद स्थिती निर्माण होऊ शकते वैयक्तिक जीवनात मात्र काही वेळेस ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आपल्या स्वभावातील बदल याला कारणीभूत ठरू शकतो आपल्या स्वभावात परिवर्तन होऊन गूढता येईल आपल्या क्रोधावर व वागणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील आपल्या जीवनसाथीच्या भावना आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता तशीच आपली मते इतरांवर लादू नका नोकरी व्यवसाय धंद्यात काही वेळेस अचानक विरोधी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो इतरांच्या मतास उचित प्राधान्य द्या
|
 |
भरभराट होईल
वृषभ : आपल्याला शुभ ग्रहांचे पाठबळ लाभेल.अनुकूलता वाढेल व्यवसाय धंद्यात उत्तम उत्तम संधी मिळतील विशेषतः आयात-निर्यातशी संबंधित व्यवसायाची भरभराट होईल तसेच तांत्रिक ऑटोमोबाइल क्षेत्रात उलाढाल वाढेल अत्याधिक लाभाची शक्यता पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती यशस्वी ठरतील नोकरीचा शोध संपुष्टात येईल सरकारी स्वरूपाची कार्य प्रभावशाली व्यक्ती मार्फत पूर्ण होतील जमीनजुमला संपत्ती विषयीच्या कामातून विशेष लाभ होण्याची शक्यता आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल या कार्यात आपल्याला कुटुंबातील ज्येष्ठांची मदत मिळू शकते व्यवसाय-धंद्यात नोकरीत उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जुळतील दाम्पत्य जीवनात काही वेळ ताणतणाव राहण्याची शक्यता वाद-विवादा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा
|
 |
समस्या संपुष्टात येतील
मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या समस्या संपुष्टात येतील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. सामाजिक मानसन्मान मिळवून पत प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या व बुद्धी कौशल्याच्या जोरावर दीर्घकाळ रखडलेली कामे खुबीने पूर्ण करू शकाल समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा तसेच ओळखी मध्यस्थी चा उपयोग करून घ्याल स्वास्थ्य चांगले राहून आरोग्याच्या तक्रारी दूर होतील नोकरीमध्ये अनुकूल घटना घटित होऊन विरोधक नतमस्तक होतील. वरिष्ठांची तसेच सहकाऱ्यांची मर्जी टिकून राहील उत्साहात वृद्धी होऊन आपल्या समोरील कार्ये वेगाने पूर्ण करू शकाल स्वतःच्या घराच्या बाबत बघितलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता परंतु त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक राहील
|
 |
नवीन करारमदार होण्याची शक्यता
कर्क : सध्याच्या कालावधीमध्ये जुनी नाती नव्याने प्रस्थापित होऊन जुने मित्र मंडळी भेटू शकतात जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल जुने वाहन बदलण्याची इच्छा बरेच दिवस मनात घोळत होती ती या दिवसात पूर्ण होऊन नवीन वाहन खरेदी करू शकाल कुटुंबात आपल्या वडिलांकडून अथवा ज्येष्ठांकडून एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते व्यवसाय धंद्यातील परिस्थिती बदलेल काही नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे नवीन नियोजन करू शकाल नोकरी व्यवसाय धंद्यात वर्तमानात येणारी असलेली आव्हाने स्वीकारून आपण त्यावर मात करू शकाल आत्मविश्वास वाढेल. जे जातक डीलरशिप, ऑटोमोबाईल, तेल रिफायनरी ,लोखंड,इस्पात इत्यादी व्यवसायात आहेत अशांचा पुढील व्यावसायिक प्रवास सुखकर होईल. समस्या संपुष्टात येतील नोकरीमध्ये जास्तीचे काम करावे लागल्यामुळे कामाचा ताण जाणवू शकतो सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सरकारी अथवा इतर माध्यमातून लाभ होऊ शकतो
|
 |
भाग्योदय
सिंह : ज्या जातकांचा परदेशी व्यापार-व्यवसाय अनुबंध आहे अथवा जे जातक बहुराष्ट्रीय अस्थापने बरोबर संबंधित आहेत अशा जातकांचा भाग्योदय होईल नोकरीत पदोन्नती वेतन समृद्धी मिळेल इतर व्यवसायात आपण परदेशी असलेले संबंध अधिक दृढ बनवण्यात सफल रहाल. परदेशगमनाची संधी. नव्या करारांची शक्यता व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आपल्याला स्वतःचे स्वास्थ्य संबंधी अधिक सतर्क राहावे लागेल कुटुंबातून आपल्याला आपल्या जीवनसाथीच्या भरपुर सहयोग मिळेल आत्मविश्वासात वृद्धी होईल कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते या कार्यात आपल्या सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील
|
 |
नवे अनुबंध जुळतील
कन्या : आपण काही खास लोकांच्या संपर्कात याल नवे अनुबंध जुळतील याचा आपल्याला दीर्घकालीन फायदा आपल्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील स्पर्धकांवर ती मात करू शकाल प्रसिद्धी मिळेल व्यवसायिक परिस्थिती सुधारेल व्यवसाय-धंद्यात तसेच अपेक्षित असलेले सहकार्य मिळत राहील. आर्थिक स्तर उंचावेल आपण उत्साहानं कार्यमग्न रहाल कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण वेगळे ठेवा पारिवारिक गोष्टींमध्ये आपल्याला धैर्य व संयम ठेवण्याची आवश्यकता आहे गर्भवती स्त्रियांनी आपली स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल तसेच घरातील लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे आप्तेष्ट नातेवाईक यांच्या बरोबरी संबंधात ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे चालू नोकरीत अनुकूलता अनुभवाल पदोन्नती मिळू शकते काही आर्थिक फायदे मिळतील
|
 |
यश व प्रसिद्धी मिळेल
तूळ : काही शुभ योगांच्या मुळे आपण लाभान्वित व्हाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहून व्यवसायात यश आणि प्रसिद्धी मिळवता येईल ऑटोमोबाईल तेलक्षेत्र कायदेशीर सेवा इत्यादी प्रकारच्या व्यवसायां मध्ये लाभ प्राप्त होतील आपल्या स्थायी मालमत्ते मध्ये वृद्धीचे योग आहेत आपल्या व्यवसाय तसेच कार्यक्षेत्रात कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळीचे वातावरण राहील वाढते खर्चाचे प्रमाण आपल्याला अस्वस्थ करू शकते कुटुंबातील महिला कुटुंबातील कार्यात व्यस्त राहतील नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांचे त्यांच्या कामाबद्दल आपल्या कार्यक्षेत्रात कौतुक होईल प्रशंसेस पात्र ठराल ज्या जातकांचे कोर्ट कचेरी मध्ये दावे चालले असतील त्यांच्या दाव्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने आत्मविश्वासात वृद्धी होईल
|
 |
महत्त्वकांक्षा पूर्ण होतील
वृश्चिक : जुने संबंध नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता परंतु ते संबंध पुन्हा नव्याने जोडावया चे अथवा नाही हे पूर्ण विचारांती ठरवणे महत्त्वाचे ठरेल. नंतर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका रोजच्या जीवनात काही नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे सभोवतालच्या परिस्थितीचे पूर्ण आकलन करून नंतर निर्णय घ्या. समस्यांचे निवारण करू शकाल पूर्वार्ध मध्ये आपल्या नोकरी व्यवसाय धंद्यात काही वेळेस ताण तणाव निर्माण होऊ शकतो आपण आपल्या विचारशक्तीच्या जोरावर योग्य ते निर्णय घेऊ शकाल आपण या काळात पूर्ण विचार मग्न रहाल काही बाबतीत सकारात्मक विचार आपल्याला उत्तेजित ठेवतील मनात असलेली अनामिक भीती दूर होईल मध्यवर्ती कालानंतर परिस्थिती सुधारेल काही नवीन घटना घडून आपल्या विचारांमध्ये बदल घडतील
|
 |
जीवनात प्रगती होईल
धनु : काही महत्त्वाची कठीण कार्य पूर्ण करता येतील ज्यामुळे आपल्या जीवनात प्रगती करून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल समाजातील मान्यवर तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहवास लाभेल गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल नवीन नवीन संधी मिळतील त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे राहील रखडलेली कार्य पूर्ण करता येतील तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन कर्ज मुक्त होता येईल आपल्या स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न उराशी बाळगून होते अशा जातकांनी त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास प्रयत्नांना यश मिळेल कुटुंबातून सहकार्य लाभेल जीवन साथी चे सहकार्य मिळेल आपल्या कुटुंब विषय असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील समाधानी राहाल नोकरीत अनुकूलते मध्ये वृद्धी होऊन वेतन वृद्धि पदोन्नती मिळेल केलेल्या कष्टाचे चीज होईल
|
 |
शुभवार्ता मिळतील
मकर : आपली कारकीर्द प्रकाशझोतात येऊन प्रशंसेस पात्र ठराल व्यवसाय धंदा नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती अनुभवता येईल नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन बक्षिसी मिळू शकते अनपेक्षित शुभवार्ता मिळतील उन्नती प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास करावा लागण्याची शक्यता अधिकांश प्रवास सफल होतील नोकरीमध्ये बदलीची शक्यता कामाच्या स्वरूपात बदल तसेच अधिकारात वृद्धी वैवाहिक जीवनात परिस्थिती अनुकूल राहील . कुटुंबात आपली मते इतरांवर लादू नका व्यवसाय-धंद्यात येणी वसूल होतील मात्र वसुली करताना वाद-विवाद टाळा सामाजिक मान सन्मान मिळेल.बोलण्यावर तसेच स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण हवे कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना कडून सुवार्ता समजतील
|
 |
उत्साहात भर पडेल
कुंभ : आपण सकारात्मक राहणे जरुरीचे आहे कोणत्याही क्षेत्रातील वादग्रस्त प्रश्न समस्या जपून हाताळा आपल्या सकारात्मक राहण्याने आपल्याला वेगवेगळ्या लाभांनी लाभान्वित होता येईल .भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील चालू नोकरीत अचानक काही समस्या उद्भवू शकतात सहकार्यांच्या कडून अपेक्षित सहकार्य मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच वरिष्ठांना बरोबर मतभेद डोके वर काढू शकतात सावधानतेने समस्या हाताळणे हितकारक ठरेल मात्र ही परिस्थिती थोड्याच काळ राहील आजूबाजूच्या वातावरणात फरक पडून आर्थिक परिस्थिती सुधारेल भविष्याचा विचार करणे फायद्याचे ठरेल व्यवसाय धंद्यात जर काही नवीन नियोजन करण्याचा विचारात असल्यास नियोजन यशस्वी होईल
|
 |
आर्थिक व्यवहार सावधानतेने करा
मीन : कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची आवश्यकता. कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे त्याच प्रमाणे जुगार सदृश्य व्यवहार व तेजी-मंदी संबंधित व्यवहार यापासून अलिप्त राहा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल . आपल्या वैवाहिक जीवनात कडू-गोड अनुभव येतील कुटुंबात किरकोळ कारणा वरून कलह सदृश्य प्रसंग निर्माण होण्याची शक्यता त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल आपल्या कार्यक्षेत्रात सफलता मिळू शकते विशेषता व्यवसाय-धंद्यात नव्या संकल्पनांचा- नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्यवसाया साठी पोषक ठरेल व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील व्यवसाय धंद्यातील आर्थिक गरज भागेल परंतु थोड्याशा फायद्यासाठी गैरमार्गाचा अवलंब भविष्यात चांगलाच नुकसानकारक ठरू शकतो हे लक्षात ठेवा
|