‘बिग बॉस’चा प्लॅटफॉर्म मला मिळाला!

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठी ६ ची विजेती तन्वी कोलते ही तिच्या परखड बोलण्यामुळे आणि प्रामाणिक खेळामुळे ओळखली गेली. 'तन्वी कोलते खूप बोलते' हा तिचा डायलॉग बिग बॉसमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.


तन्वीचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा मोरशी येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यानंतर देवरुख आंबव येथील राजेंद्र माने विद्यालयात तिने डिप्लोमा केला. पुढे पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना देखील तिने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. ती डान्समध्ये तसेच स्पोर्ट्समध्ये देखील असायची.


बिग बॉस मराठीमध्ये जाण्याचा तिचा खूप आधीपासून विचार होता, परंतु संधी मिळत नव्हती. संधी मिळाल्यानंतर मात्र त्याचं तिने सोनं केलं. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. एखाद्या मालिकेमध्ये काम केल्यानंतर ती पात्रे लोकप्रिय होतात. पण तिला तन्वी नावाने लोकप्रिय व्हायचं होतं. यासाठी तिने बिग बॉस मराठीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला तिच्या घरून देखील सकारात्मक पाठिंबा मिळाला. आई- वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा तिला बिग बॉसच्या घरात राहताना खूप फायदा झाला.


बिग बॉसची विजेती होईल असे तिला वाटत होते, कारण ती सकारात्मक विचार करीत होती. बिग बॉसने तुला काय दिले असे विचारले असता ती म्हणाली, "बिग बॉसने खरं तर मला क्रॅश कोर्स दिला. जिथे जिथे चुका होत होत्या, तिथे तिथे आम्हाला चुका दाखविल्या जात होत्या. रिॲलिटी चेक आपण म्हणतो त्याला, जे भाऊच्या धक्क्यातून आम्हाला मिळत होतं. आयुष्यात आपलं काय चुकतंय, आपल्यात कोणता बदल घडवला पाहिजे, हे कळलं. बिग बॉसने आम्हाला खूप प्रेम दिलं. घराच्या आत असताना गेम खेळत होतो, त्यांनी आम्हाला घरची आठवण येऊ दिली नाही. रोलर कोस्टर राईड तुम्ही म्हणू शकता. कधी भांडणं असायची, कधी इमोशनल वातावरण असायचं. कधी कधी रेस्टवाला दिवस असायचा. मी तेथे बरेच चढउतार बघितले. स्टाँग कसे राहायचे हे मी त्या घरात शिकले."


इतर सहकाऱ्यांसोबत बिग बॉसच्या घरात राहण्याचा तुझा अनुभव कसा होता असे विचारल्यावर तन्वी म्हणाली, "इतर सहकलाकारांबद्दल सांगायचं झालं तर सगळेच चांगले होते. सगळेच गेम खेळलेले आहेत. प्रत्येक जण जे काही वागलेले आहे ते गेमसाठी वागलेले आहेत. प्रत्येकाला जिंकायचं होतं. भांडणं झाली की त्या व्यक्तीचा राग यायचा. पण भांडण संपल्यावर वाटायचं कशासाठी आपण त्यांच्याशी भांडलो, उगाचच. तीन महिन्यांनंतर सगळंच संपणार आहे. त्यामुळे कोणी वाईट आहे असे मला वाटत नाही."
बिग बॉसच्या घरात तुला काय आवडायचे व काय आवडत नसे असे विचारल्यावर ती म्हणाली, “बिग बॉस जेव्हा मला आदेश द्यायचे, आमचे कौतुक करायचे. बोलायचे तन्वी छान दिसताय, दीपाली छान दिसताय. ते आम्हाला प्रोत्साहन असायचे. बिग बॉसचा आवाज ही माझी आवडती गोष्ट होती. बिग बॉसने आम्हाला खूप काही दिले, त्यामुळे न आवडणारी गोष्ट सांगणे तसे कठीण आहे. सकाळी उठायला आवडत नव्हते, अजून झोपावसं वाटायचं, ते वेक अप साँग लागू नये असं वाटायचं. एकदा साँग लागलं की फ्रेश होऊन नाचावं लागायचं व झोप उडून जायची आणि मला झोपावसं वाटायचं. पण रोल ब्रेक होईल म्हणून झोपता येत नसे."


तू बिग बॉस मराठी ६ ची विजेती ठरलीस याचे श्रेय कोणाला देशील असे विचारल्यावर तन्वी म्हणाली, “मी विजेती झाले याचे श्रेय बिग बॉसला, रितेश सरांना, प्रेक्षकांना देईन. रितेश सर आम्हाला जनतेची मते सांगत असत, त्यामुळे मला माझ्या चुका सुधारायला मिळाल्या. याशिवाय मी विजेती ठरल्याचे श्रेय बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना देखील देईन, ज्या प्रकारे ते गेम खेळत होते, त्यांच्याशी गेम खेळायला मजा येत होती, टक्कर देत होते, त्यामुळे अजून खेळामध्ये एक इंटरेस्ट येत होता. तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कोणता असे तन्वीला विचारले असता ती म्हणाली, “माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट हाच होता, की बिग बॉस हा प्लॅटफॉर्म मला मिळाला. इतके वर्षे मी वाट पाहत होते बिग बॉसमध्ये येण्याची, फायनली मला तेथून कॉल आला की मी सिलेक्टेड आहे. बिग बॉसमध्ये मी आले हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता.” तन्वी कोलतेला आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आहे, तिचं स्वतःचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे ती नवीन प्रोजेक्टची आतुरतेनं वाट पाहत आहे. जे पंख बिग बॉसने तिला दिलेले आहेत, त्याच्या सहाय्याने भरारी घेण्याचा ती प्रयत्न करणार आहे.


तन्वीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

प्रत्येक रंगकर्मी कधी ना कधी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकतोच आणि तिथून त्याचा नाट्यावकाशातला प्रवास सुरू होतो. पुढे

वीण लिखाणाशी ही तुटेना...

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  मुग्धा गोडबोले - रानडे मुग्धा गोडबोले-रानडे सध्या अभिनयासोबत लेखनाची बाजू

व्यावसायिकतेवर नव्या पिढीचे-शिक्कामोर्तब’

भालचंद्र कुबल-पाचवा वेद आत्ता कुठे नव्या पिढीचे, नव्या दमाचे मराठी दिग्दर्शक हळूहळू सावरून चालायचा प्रयत्न

अभिनयाचा मुसाफिर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  पंकज विष्णू सध्या अभिनयाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. ‘श्री बाबा नीब करोरी महाराज' या

कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल

एका निरीक्षणाची प्रस्तावना

भालचंद्र कुबल-पाचवा वेद एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रंगभूमीवरील