छत्तीसगड : आपल्या मनात जर जिद्ध असली तर कोणतंही शिखर सर करायला अवघड घाड नसत. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत ही एकमेव गुरुकिल्ली असते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे छत्तीसगडमधील भूमिका यादवची, १९ वर्षांची मुलगी छत्तीसगढच्या एका छोट्या गावातून थेट परिसपर्यंत पोहोचली. जगातील सर्वात मोठ्या Chanel या ब्रँड साठी रॅम्पवॉक करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली आहे.
रायपूरची भूमिका पॅरिसमध्ये चमकते
छत्तीसगडमधील रायपूरच्या सामान्य गल्ल्यांमधून भूमिका थेट पॅरिसच्या रॅम्पवॉक पर्यंत पोहोचली आहे. लहानपणापासूनच भूमिकाला रॅम्पवॉकची आवड होती, परंतु त्याआड यायचा तो तिचा सावळा रंग, अनेकदा तिला तिच्या रंगावरून टोमणे ऐकावे लागले, हिणवलं गेलं पण याच रंगाने आज तिला जगाच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.
सौंदर्य आणि प्रतिभेसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असलेल्या 'मिस इंडिया'च्या ६१ व्या पर्वाचा नुकतेच ऐतिहासिक समारोप झाला. १८ एप्रिल २०२६ ...
यामुळे भूमिकाच नशीब पालटलं
Nnijas Model Management एका सावळया मॉडेलच्या शोधात होते, या एजन्सीने भारतात आपल्या मॉडेलचा शोध घेतला असता, रायपूरच्या गल्लींमधील भूमिका त्यांच्या नजरेत आली आणि या एका गोष्टीमुळे भूमिका यादवच संपूर्ण नशीबच बदलल. मुळात भारतीयांचा मूळ रंग हा सावळा आहे, परंतु याच रंगाला भारतात हिणवलं जात, तुच्छ मानलं जात , पण आज तोच रंग भूमिकामुळे ग्लोबल फॅशन इंडस्ट्रीसाठी प्युअर इंडियन ब्युटी ब्रँड ठरला आहे.
महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध पैठणी साडी असो किंवा ...
शिखर गाठलं आहे पण पाय अजून जमिनीवरच
भूमिकाने आतापर्यंत Chanel साठी तीनवेळा रॅम्पवॉक केला आहे तर प्रसिद्ध American Vogue या ब्रँड साठी देखील काम केले आहे, सध्या ती पॅरिसमध्ये राहत असून फ्रान्स, भारत आणि युकेमधील आपलं करिअर उत्कृष्टरित्या सांभाळत आहे.
माझ्या रंग माझ्यासाठी सर्वस्व आहे, या रंगामुळेच मी आजवर इथपर्यंत येऊन पोहोचले आहे, डोळ्यात स्वप्न असली मनात जिद्द असली तर तुमचा रंग, तुमचं राहणीमान यापैकी कशानेही फरक पडत नाही, सध्या सोशल मीडियावर तिचे कौतुक होत असून अनेक नेटकरी तिचे भरभरून कौतुक करत आहे, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






