Nashik : एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी अशी कथा अन् चित्रपटात शोभेल अशी थरारक कारवाई नाशिक पोलिसांनी (Nashik Police) केली आहे. बनावट सरकारी अधिकाऱ्यांची ओळख सांगून लूट करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनीही वेषांतर केले होते. एक पोलीस रिक्षाचालक तर दुसरा पोलीस पाणी बॉटल विक्रेता बनून संशयितांवर नजर ठेवत होता. या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अखेर टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेचा आंघोळ ...
नेमकी घटना काय ?
८ जुलै रोजी पंचवटी (Panchavati) परिसरात गुजरातमधील (Gujarat) एका व्यापाऱ्याला सरकारी दिवा लावलेल्या कारमधून आलेल्या आरोपींनी अडवले. स्वतःला आयकर, ईडी, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau) आणि इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी आरोपीला अडवले. पुढे त्यांनी व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर व्यापाऱ्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याच्याकडील सुमारे ७० लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) व्यापाऱ्याला सोडून आरोपी फरार झाले.
मुंबई : अंधेरी (Andheri) पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही ...
संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे वेषांतर
या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींचे धागेदोरे वसई-विरार (Vasai-Virar) परिसरात मिळाल्यानंतर विशेष पथक तेथे दोन दिवस मुक्कामी होते. संशयितांवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी वेषांतराचा मार्ग स्वीकारला. एक पोलीस रिक्षाचालक बनून परिसरात फिरत होता, तर दुसरा पाणी बॉटल विक्रेत्याच्या भूमिकेत माहिती गोळा करत होता. दरम्यान, आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करत पुन्हा नाशिककडे मोर्चा वळवला. याबाबत माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि सर्व नऊ आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) दोन, झारखंडमधील एक, वसईतील एक त्यासोबतच जळगावमधील एका महिलेचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीबद्दल राज्यातील शेतकऱ्यांकडून सन्मान मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची ...
लाल दिव्याची गाडी, बनावट ओळखपत्रे जप्त
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत . त्यामध्ये आरोपींकडून ५५ लाख १० हजार रुपयांची रोकड, सरकारी दिवा लावलेली कार, रिव्हॉल्व्हर, एमपी-५ रायफलसदृश शस्त्रे, आयकर, गृह, सीबीआय (CBI) आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास (Railway Pass) , विविध सरकारी शिक्के असा तब्बल ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या टोळीचे इतर राज्यांतील गुन्ह्यांशीही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बनावट सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीच्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे.





