Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. १५२ मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतदानावेळी जाळपोळ, तोडफोड आणि मारहाणीच्या घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.


मुर्शिदाबादमध्ये एजेयूपी प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर दंगलखोरांनी काठ्या आणि विटांनी हल्ला केला. या घटनेनंतर टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कबीर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांशीही त्यांचा वाद झाला.


दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. बूथ जॅमिंगची तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सरकार यांना काही जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पोलिस उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.



कूचबिहारच्या तुफानगंज परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला.


मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली.





सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


दरम्यान, टीएमसीने राज्याबाहेरून गुंड आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. आसनसोल उत्तरचे उमेदवार मलय घटक यांनी पाच विशेष ट्रेनमधून बाहेरील लोकांना आणल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.



जामुरिया मतदारसंघात एका बेवारस वाहनात ईव्हीएम आढळल्याच्या दाव्यामुळेही वातावरण अधिकच तापले आहे. या वाहनाजवळ कोणताही सुरक्षा कर्मचारी नसल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)