US-India Trade Deal : अमेरिका-भारत व्यापार करारासाठी भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.


सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.



अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)