Tuesday, April 21, 2026

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या मुंडाथिकोड गावात घडली. येथे आगामी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवासाठी फटाके आणि कच्चा माल एका शेडमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर २ जणांना रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.प्राथमिक अहवालानुसार, स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले आणि काहींनी तो भूकंप असल्याचा समज केला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक भाजले गेले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेनंतर परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. हे फटाक्यांचे गोदाम तिरुवंबाडी देवासम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, येथे सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >