BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद

विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेध


मुंबई : महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.


">मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.


राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.



विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.


यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.


यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.



Tags
Narendra ModiDevendra Fadanvisbmc newsNari Shakti Vandan Adhiniyam' Billmumbau mahapalika
Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य