Chhattisgarh Plane crashes : डोंगराला धडकून विमानाचा अपघात; वैमानिकांचा मृत्यू

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील खुर्सागढा गावाजवळ रतनपहली जंगलात हा अपघात घडला. एका डोंगराला विमान धडकल्यामुळे झालेल्या या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अपघाताच्या वेळी हे विमान ३० फूट उंचीवरून उड्डाण करीत होते.


अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा प्रायव्हेट जेट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. लँडिंगच्या प्रयत्नात असलेले विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले होते.



तसेच २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे एक एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळली होती. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीकडे जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या १७ मिनिटांत कोसळले होते. त्यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि क्रू सदस्य होते. दरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात २ वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला असला तर अपघातची विस्तृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

Comments
Add Comment

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)

भारतीय रेल : दिल्ली-पटना-हावडा मार्गावरील ८४५ गाड्यांचे वेळापत्रक बदलले; ३३८ गाड्या रद्द, तर ३८४ मार्गात बदल

नवी दिल्ली : तुम्ही येत्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत