छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील खुर्सागढा गावाजवळ रतनपहली जंगलात हा अपघात घडला. एका डोंगराला विमान धडकल्यामुळे झालेल्या या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अपघाताच्या वेळी हे विमान ३० फूट उंचीवरून उड्डाण करीत होते.
मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. मासळी बाजाराची इमारत अर्थात ...
तसेच २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे एक एअर अॅम्ब्युलन्स कोसळली होती. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीकडे जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या १७ मिनिटांत कोसळले होते. त्यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि क्रू सदस्य होते. दरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात २ वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला असला तर अपघातची विस्तृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही.






