BMC News : डासांची उत्पत्ती रोखणार 'मुव्ही ट्रॅप’ अभिनव उत्पादनाचा शुभारंभ

मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल"च्या माध्यमातून मुंबईतील विविध स्टार्टअप उद्योगांना बळ देण्याचे करण्यात येत असलेले कार्य अभिनंदनीय आहे, असे उद्गार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांनी काढले. ते आज 'मुव्हीट्रॅप' या डास निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या उत्पादनाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.


या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ प्रा. ए. पी. दाश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, प्राध्यापक सुशांता कुमार घोष, दिल्ली स्थित ‘आय. सी. डी. एच. आय.’ या संस्थेचे सल्लागार डॉ. रजनी कांत, महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या डॉ. शशी बाला, नायर रुग्णालयातील 'प्रिव्हेंटिव्ह व सोशल मेडिसिन' विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर रुजुता हाडये, महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे, 'मुव्ही ट्रॅप' या स्टार्टअप संस्थेचे प्रसाद फडके आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.



डासांच्या उत्पत्तीला आळा घालणाऱ्या 'मुव्ही ट्रॅप' या सापळ्याचे उत्पादन करणारी ‘स्टार्ट अप’ संस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" चा भाग आहे. याबाबत अधिक माहिती देताना शशी बाला यांनी कळविले आहे की, महानगरपालिका क्षेत्रातील मलेरिया नियंत्रणाकरिता ‘इको बायो ट्रॅप’ या नवउद्यमींचा (स्टार्ट अप) चा समावेश यापूर्वीच करण्यात आला होता. त्याच कंपनी द्वारे आता 'मुव्ही ट्रॅप' या अभिनव उत्पादनाची निर्मिती करण्यात आली आहे. हे उत्पादन प्रामुख्याने घरामध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आले असून यामुळे डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होऊ शकतो.


‘मुव्ही ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणा-या आणि पर्यावरणपूरक असणा-या सापळ्याकडे त्यातील ‘ऍट्रॅक्टन्टस्’ मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला जात असल्याने डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो. ज्यामुळे साहजिकच मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो, अशी माहिती संबंधित संस्थेद्वारे या कार्यक्रमादरम्यान देण्यात आली.



'मुव्ही ट्रॅप' कसे काम करते?


‘मुव्ही ट्रॅप’ संबंधित संस्थेद्वारे या कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार ‘मुव्ही ट्रॅप’ मध्ये निर्धारित प्रमाणात पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक यांचे मिश्रण असणारी एक छोटी पिशवी (सॅचेट) टाकायचे असते. डासांची मादी पाण्यात अंडी घालते, ही बाब लक्षात घेऊन पाणी व सॅचेट टाकलेले मुव्ही ट्रॅप डासांचा प्रादुर्भाव असणा-या ठिकाणी ठेवले जाते.


ट्रॅपमध्ये असणा-या पिशवीतील ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक IGR ग्रॅन्युअल) हे पाण्यात तात्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ऍट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते. तर पाण्यात असणारे सौम्य स्वरुपाचे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. अशाप्रकारे डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे डासांच्या भविष्यातील प्रजोत्पादनास प्रतिबंध होतो व पर्यायाने डासांपासून पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.


‘मुव्ही ट्रॅप’ मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ आठवडे साठवून ठेवता येते. याचाच अर्थ डासांच्या प्रजोत्पादनाच्या मुळावरच घाव घालणारा हा सापळा ४ आठवडे कार्यरत असतो. विशेष म्हणजे या सापळ्यात वापरण्यात आलेली ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणा-या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्यास वीज देखील लागत नाही.



याबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डास प्रतिबंधासाठी घरगुती स्तरावर वापरली जाणारी यंत्रे किंवा इतर बाबी या डासांना पळवून लावतात. मात्र, इको बायो ट्रॅप हे डासांची अंडीच नष्ट करत असल्यामुळे डासांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण आणते, अशी माहिती संबंधित संस्थेचे प्रसाद फडके यांनी या निमित्ताने दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना फडके यांनी सांगितले की, 'मुव्ही बायो ट्रॅप हे ‘पॅसिव्ह’ आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे उपकरण आहे. इको बायो ट्रॅप हे आकाराने छोटी असल्यामुळे ते घरामध्ये सहजपणे ठेवता येते. हे उपकरण लार्व्हा स्रोत व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे. ‘इको बायो ट्रॅप’ मुळे डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि चिकनगुनिया, डेंग्यू, झिका आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाच्या वेळी सध्याच्या एकात्मिक डास नियंत्रण व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये याचा समावेश होऊ शकतो.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी