BMC News : नगरसेवकांच्या गाड्यांना आरटीओने फाडले चलन

महापालिका मुख्यालय परिसरात नगरसेवकांच गाड्यांवर कारवाई


नगरसेवकांमधून वाहनतळाची सुविधा देण्यात प्रशासन अकार्यक्षम


मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात सध्या उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांच्या वाहनांना सध्या आरटीओची चलनच अधिक फाडले जात आहे. मुख्यालय इमारतीच्या शेजारी वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने आसपासच्या जागेत तसेच रस्त्याच्या कडेला नगरसेवक आपली वाहने उभी करतात. या वाहनांचे फोटा वाहतूक पोलिसांनी काढून त्यांच्या नावे दंडाचे चलन फाडण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी बारा ते पंधरा नगरसेवकांच्या वाहनांच्या नावे दंडाची चलन फाडली गेल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.एवढेच नाही तर सहायक आयुक्तांच्या वाहनांवरही दंडाच्या चलन फाडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनतेला वाहनतळाची सुविधा देणाऱ्या महापालिकेला आपल्याच नगरसेवकांना वाहनतळाची सुविधा देता येत नसल्याने ही अधिकच वाढली आहे.


मुंबई महापालिका मुख्यालय सभागृहात सध्या अर्थसंकल्पावर भाषण सुरु असून महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवक उपस्थित राहत आहेत. परंतु, त्यांची वाहने उभी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे पुरेशी जागा नाही. मागील काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांची वाहने रस्त्यावर लावलेली असताना त्यांना वाहतूक पोलिसांनी चलन फाडली. परंतु मागील दोन दिवसांमध्ये हे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी तर हद्दच केली आणि रस्त्यांसह आसपास लावलेल्या नगरसेवकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनांवर नगरसेवकांचे स्टीकर लावूनही ही कारवाई झाल्यामुळे तसेच वाहने उभी करण्यास जागा नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला ही उभी केल्यानंतर ही कारवाई झाल्यामुळे ही नाराजी अधिक पसरली.


याबाबत सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिका सभागृहात प्रचंड चिड व्यक्त केली.शुक्रवारी दिवसभरात १२ ते १५ नगरसेवकांच्या वाहनांचे फोटो वाहतूक पोलिसांनी काढून त्यांच्यावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत स्थानिक वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना तसेच सहआयुक्त पोलिस यांच्याशी बोलण्यात आले आहे. तरी महिन्याला चार ते पाच सभागृह भरतात आणि आता सलग सभागृह भरत असल्याने सर्वच नगरसेवक येत असतात. अशा परिस्थितीत जर त्यांच्या वाहनांवर स्टीकर असूनही कारवाई होत असेल तर अत्यंत निंदनीय बाब असून महापौरांनी याबाबत सहआयुक्त पोलिस कुंभार यांच्याशी बोलून अशाप्रकारची कारवाई महापालिका मुख्यालय परिसरात नगरसेवकांच्या स्टीकर असलेल्या वाहनांवर होवू नये अशाप्रकारच्या सूचना कराव्यात.


नगरसेवकांच्या वाहनांवर ही कारवाई केलीच आहे, परंतु ज्या वाहनांवर डिझास्टर मॅनेजमेंट असा उल्लेख असलेल्या सहायक आयुक्तांच्या वाहनांवरही अशाप्रकारची दंडात्मक कारवाई महापालिका मुख्यालय परिसरात होते हे त्यापेक्षाही भयानक आहे. वाहतूक पोलिसांनी जर अशाप्रकारची प्रवृत्ती असेल तर लिंकींग रोडवर खासगी वाहने पदपथावर उभ्या असतील त्या सर्व वाहनांवर महापालिकेने कारवाई करावी आणि जप्त कराव्यात अशाही सूचना त्यांनी केल्या.

Comments

Redij Kiran    April 18, 2026 03:54 AM

Good ..RTO Concgarechulestion

Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६