BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन धुळखात पडून होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक येणार हे माहीत असतानाही समिती अध्यक्षांच्या कार्यालयाची दुरुस्ती का केली नाही. विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांची दालन पंचतारांकित हॉटेल प्रमाणे, मात्र प्रभाग समिती अध्यक्षांची दालने ही कोंडवाडा प्रमाणे आहेत, असा आरोप स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनी केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याठिकाणी भेट द्यावी, कर्मचारी वर्ग अरुंद जागेत बसतात. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करावे, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर स्थायी समितीच्या बैठकीत केली.


जी उत्तर विभाग कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचा ३४.३४ टक्के उणे दराने काम करण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शवली आहे. त्यामुळे कामाचा दर्जा काय राखणार, चूक झाली तर कारवाई करणार का, असा सवाल स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी उपस्थित केला. यावेळी स्थायी समिती सदस्यांनी सहायक आयुक्तांच्या पंचतारांकित कार्यालयाकडे लक्ष वेधले. एवढ्या कमी दरात हे काम कसे करणार असा सवाल भाजपच्या शीतल गंभीर यांनी केला. एन विभागाचे कार्यालय खासगी मालकाच्या जागेवर आहे. त्यामुळे मुंबई महापालिका विभाग कार्यालयासाठी जागा उपलब्ध करु शकत नाही का,असा सवाल स्थायी समिती सदस्य राखी जाधव यांनी उपस्थित केला. सहाय्यक आयुक्तांना आता प्रभाग समिती अध्यक्षांच्या दालनात बसवा आणि समिती अध्यक्ष सहायक आयुक्तांच्या कार्यालयात बसतील, असा टोला गणेश खणकर यांनी यावेळी लगावला.



दरम्यान, प्रशासनाने सगळ्या सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, तोपर्यंत प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी