Pakistan HIV Outbreak: पाकिस्तानची कुचकामी आरोग्यव्यस्था : एकाच सुईने चक्क ३३१ चिमुकल्यांना दिले ‘एड्स’चे इंजेक्शन; अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ताउंसा शहरातून एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ३३१ मुलांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असून, या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


एका अहवालानुसार, ताउंसा येथील सरकारी टीएचक्यू रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयात एकाच सिरिंजचा पुन्हा पुन्हा वापर केला जात असल्याचे समोर आले असून, अनेक मुलांना एकाच औषधाच्या बाटलीतून इंजेक्शन देण्यात आले. यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला.


या प्रकरणाची उकल आठ वर्षांच्या मोहम्मद अमीनच्या मृत्यूनंतर झाला. त्याची बहीण असमा हिलाही एचआयव्हीची लागण झाली आहे. मुलांच्या आईने आरोप केला आहे की, रुग्णालयातील दूषित सुईंमुळेच त्यांच्या मुलांना हा संसर्ग झाला.



तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तब्बल ६६ वेळा निर्जंतुकीकरण न केलेल्या हातमोज्यांशिवाय इंजेक्शन दिल्याचे आढळले. तसेच एका परिचारिकेला वैद्यकीय कचऱ्यात हातमोज्यांशिवाय हात घालताना पाहिले गेले.



पंजाब एड्स स्क्रीनिंग कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार, निम्म्याहून अधिक प्रकरणांमध्ये “दूषित सुई” हेच संसर्गाचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये संसर्गाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.


या घटनेमुळे पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना