PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सकाळी ११ वाजता मंडया जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करून दर्शन घेतेले.


तसेच या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह “सौंदर्य लहरी आणि शिव महिमा स्तोत्रम” नामक पुस्तकाचे संयुक्तपणे अनावरण देखील करतील.



श्री गुरु भैरवैक्य मंदिर हे डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले एक महत्त्वाचे स्मारक आहे. ते श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठाचे ७१ वे पीठाधीश्वर होते आणि त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्म या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात पूजा-अर्चा करत संतांच्या कार्याची आठवण केली आणि त्यांच्या शिकवणींना वंदन केले. या भेटीमुळे आदिचुंचनगिरी क्षेत्राचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.





स्थानिक नागरिक आणि भक्तांसाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र