Online LPG bookings : ऑनलाइन एलपीजी बुकिंंगमध्ये ९८ टक्क्यांनी वाढ; शासनाच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांच्या विश्वासात वाढ

मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि त्यादरम्यान होणारी अतिरिक्त खरेदी आता कमी झाली आहे. दरम्यान ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शासनाने केलेली कडक कारवाई, नियमित पुरवठा आणि पारदर्शक उपायांमुळे विनाअडथळा गॅस मिळण्याची खात्रीही ग्राहकांना पटली आहे. यामुळे ग्राहक अधिक जागरूक झाले आहेत. परिणामी अतिरिक्त साठा कमी झाला असून डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे.


देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून, मार्च २०२६ पासून १ लाख २८ हजाराहून अधिक तपासण्या आणि छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये ५९ हजाराहून अधिक एलपीजी सिलिंडर जप्त करण्यात आले. साठा करून ठेवणे, काळाबाजार रोखणे, घरगुती गॅसचा गैरवापर थांबवणे आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश आहे.



सुरळीत कामकाजाचा भाग म्हणून शासनाने गॅस वितरकांवरील देखरेख अधिक कडक केली आहे. यामुळे नियमांचे पालन होण्याबरोबरच सर्व स्तरातील ग्राहकांना समान हक्क मिळण्यास मदत मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहकांचा अनुभव बदलत आहे. संपूर्ण उद्योग क्षेत्रात ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण ९८ टक्केपर्यंत वाढले आहे. तसेच ओटीपी आधारित वितरण सेवा ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे इंधन सेवेमधील पारदर्शकता, सुविधा आणि जबाबदारीपूर्वक कामाचे चित्र सुधारले आहे. देशभरातील एलपीजी वितरण व्यवस्था मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. घरगुती सिलिंडरची मागणी वाढलेली असताना कुठेही तुटवडा असल्याचे चित्र नाही. एकाच दिवसात ५१ लाखांहून अधिक कुटुंबांना सिलेंडर पोहोचविण्यात आले आहेत. ग्राहकांना पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अनेक वितरक रविवारी देखील काम करत आहेत.


त्याचबरोबर, इतर क्षेत्रांमधील पुरवठाही स्थिर ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अन्न प्रक्रिया, वस्तू निर्मिती आणि शेतीशी संबंधित मोठ्या कामांसाठी लागणाऱ्या इंधनाचा पुरवठा आता पुन्हा नियमित करण्यात आला आहे. २३ मार्चपासून १० लाखांहून अधिक व्यावसायिक सिलिंडरची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी