Israel - Iran - US War Impact : कांद्याची आता पावडर होणार!

निर्यात थंडावल्याने सरकारची योजना; तालुकानिहाय प्रक्रिया केंद्रांचे जाळे उभारणार


मुंबई : इराण-इस्रायल युद्धामुळे कांदा निर्यातीची साखळी खंडित झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, कांद्याचे कोसळणारे भाव सावरण्यासाठी राज्य सरकारने साठवणुकीपेक्षा प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त कांद्यापासून पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना ७०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव पणन विभागाने तयार केला असून, मंत्री जयकुमार रावल तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.



कांदा उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असला, तरी सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय मागणी घटली आहे. त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील दरांना बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने प्रक्रिया उद्योगाना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यातील प्रत्येक तालुक्यात कांदा प्रक्रिया केंद्र (प्रोसेसिंग युनिट) उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, ही केंद्रे चालवण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेतली जाणार असल्याने ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सुमारे २५ लाख टन कांद्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ७०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारने कांदा अनुदानावर सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याऐवजी एकदाच प्रक्रिया प्रकल्पांना बळ दिल्यास भविष्यात इतक्या मोठ्या अनुदानाची गरज उरणार नाही, असा सरकारचा कयास आहे.



प्रक्रिया उद्योगांची गरज का?


राज्यातील कांदा प्रामुख्याने श्रीलंका, बांगलादेश आणि आखाती देशांत निर्यात होतो. मात्र, बांगलादेश आणि श्रीलंकेने स्वतःच्या उत्पादनावर भर दिल्याने आणि युद्धामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने निर्यातकोंडी निर्माण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात १६० ते १७० लाख टन कांदा पिकतो, तर संपूर्ण देशाची गरज १५० लाख टनांच्या आसपास आहे. ही अतिरिक्त आवक सावरण्यासाठी प्रक्रिया उद्योग हाच शाश्वत पर्याय असल्याचे सरकारने मत आहे.



प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव


कांद्याची पावडर बनवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असून ती १० महिने टिकू शकते. सध्या बाजारात कांदा पावडरीला प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांदा महागला की ग्राहक नाराज होतात आणि दर पडले की शेतकरी हवालदिल होतो; या दोन्ही समस्यांवर प्रक्रिया उद्योग हेच उत्तर असल्याचे मत जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. ज्या तालुक्यांत कांद्याचे उत्पादन अधिक आहे, तिथे एकापेक्षा जास्त युनिट्स उभारण्याची तयारीही पणन विभागाने दर्शविली आहे.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या