BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी येथील ध्वनी व्यवस्था बदलण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून सभागृह सुरु झाल्यानंतर केवळ ध्वनी यंत्रणेची चाचपणीच केली जात असल्याने सध्या नगरसेवकांच्या टेबलावर १० ते १३ माईकची व्यवस्था आहे. त्यामुळे या माईकची उचला उचली करत सदस्यांना सभागृहात आपला आवाज उठवावा लागतो. परंतु सभागृहातील प्रत्येक नगरसेवकांचा आवाज आता बुलंद होणार असून प्रत्येक नगरसेवकाच्या टेबलावर आता माईक असेल. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्याच्या सभागृहात प्रत्येक नगरसेवकाच्या समोर माईक स्थिरावलेला दिसणार आहे.



मुंबई महापालिका मुख्य हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हेतिहासिक सभागृह असून सन २००२मध्ये आग दुर्घटनेनंतर या सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. तेव्हापासून या सभागृहात तटकते माईक बसवण्यात आलेले आहे. परंतु फेब्रुवारी २०२६मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा आवाज महापौरांपर्यंत पोहोचत नसल्याने सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहातील माईक व्यवस्था बदण्यासाठी आग्रही प्रयत्न केला. परंतु तेव्हापासून हा प्रयोगच सुरु असून त्यामुळे सध्या २३७ नगरसेवकांना केवळ १० ते १३ माईकच्या आधारे सभागृहात आपला आवाज मांडता येत आहे. मात्र आजवर प्रयोगशील चालेल्या या माईकचा प्रश्न आता निकाली निघत असून सध्या वापरात असलेल्या ध्वनी यंत्रणेचा यशस्वी प्रयोगानंतर त्यानुसार निविदा मागवण्यात आली. त्यामध्ये एडीजेएम टेक्नॉलॉजिज प्रा.लि. ही कंपनी पात्र ठरली असून ही ध्वनी यंत्रणेची व्यवस्था करण्यासाठी एक कोटी चौदा लाख सत्त्यांशी हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.



महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरी महानगरपालिका सभागृहातील जुनी ध्वनी यंत्रणा बदलून नवीन समान ध्वनी यंत्रणा बसविण्यासाठी या खात्याकडून निविदा मागवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु महानगरपालिका निवडणुकीनंतर नियुक्त गटनेते विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांच्याकडून सभागृहात एक दोन बैठका घेतल्यानंतर या ठिकाणी वायरलेस ध्वनी यंत्रणा बसविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे या जुन्या निविदेतील वायर माईक कमी करून त्याऐवजी वायरलेस माईक बसवून अद्ययावत वायरलेस ध्वनी यंत्रणा बसविण्याची कार्यवाही या विभागामार्फत करण्यात आली. परंतु वायरलेस माईकची किंमत जास्त असल्याने या खात्याकडून केलेल्या निविदेच्या अनुसार कमी वायरलेस माईक बसविण्यात आले. सद्यस्थितीत सभागृहात बैठकांच्या वेळी चर्चा करताना किंवा बोलताना उपस्थित नगरसेवकांकडे या वायरलेस माईक हस्तांतरीत करून बोलले जात आहे. परंतु, महापालिकेमध्ये एकूण २३७ नगरसेवक असून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात तत्काळ माइक उपलब्ध करून देण्याच्या सुचना दरम्यानच्या काळात इतर नगरसेवक, नियुक्त गटनेते, विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांच्याकडून करण्यात आल्या. त्यानुसार या वायरलेस ध्वनी यंत्रणेत वाढ करून अतिरिक्त वारलेस माइक व त्यासंबंधीत इतर यंत्रणा बसविण्याचे तोंडी आदेश सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडून या विभागास देण्यात आले.



सद्यस्थितीत महापालिका सभागृहात एकूण १० वायरलेस माईक बसविण्यात आले आहेत. तसेच या माइकशी संलग्न स्पिकर व इतर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या खात्याकडून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कंत्राटदारांकडूनही वायरलेस ध्वनी यंत्रणेचे प्रात्यक्षिक सभागृहात घेण्यात आले. त्यानुसार सद्यस्थितीत कार्यरत यंत्रणेत अतिरिक्त वायरलेस माइक व इतर उपकरणे समाविष्ट करून ही ध्वनी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात