Nagpur News : नागपुरात IPL सट्टेबाजीचा मोठा पर्दाफाश; ४० लाखांची रोकड जप्त, 'दुबई कनेक्शन'ने पोलीस चक्रावले!

नागपूर : आयपीएलच्या (IPL) रणधुमाळीत नागपूर शहरात सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरल्याचे समोर आले आहे. प्रतापनगर पोलिसांनी आयटी पार्क परिसरातील एका फ्लॅटवर धाड टाकून तब्बल ४० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, या कारवाईमुळे सट्टा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



नेमकी कारवाई काय?


अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत ४० लाखांच्या रोकडसह सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमन पाठक याला गुन्हे शाखेने (Crime Branch) यापूर्वीच त्याच्या इतर साथीदारांसह अटक केली होती. अमन पाठकची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड 'एस.के.' (S.K.) नावाचा इसम असल्याचे समोर आले आहे. 'एस.के.' च्या सूचनेनुसारच नागपुरात भाड्याने फ्लॅट घेऊन हे केंद्र चालवले जात होते. ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून हा सर्व काळाबाजार सुरू होता.



दुबई कनेक्शन उघड


पोलिसांच्या प्राथमिक तपासात या रॅकेटचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईतून या सट्टेबाजीच्या व्यवहारांचे नियंत्रण केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ED) किंवा इतर तपास यंत्रणांची मदत घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



पुढील तपास आणि पोलीस कोठडी


अमन पाठकची पोलीस कोठडी १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलीस सध्या 'एस.के.'चा शोध घेत असून, त्याच्या अटकेनंतर सट्टेबाजीच्या या मोठ्या रॅकेटमधील आणखी काही बड्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील