इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकाराला जाणार नाही. त्यांच्या या निर्णयातून पुन्हा एकदा इराणने भारताशी असलेले “चांगले संबंध” संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
दरम्यान, युद्धानंतर काही प्रमाणात वाहतुकीवर निर्बंध आल्याने भारताच्या सुमारे १५ जहाजे पर्शियन आखातात अडकून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एलपीजी वाहतूक करणाऱ्या ९ जहाजांना बाहेर काढण्यासाठी टोल भरल्याच्या बातम्यांनाही भारताने नाकारले आहे.
- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली संपूर्ण जगाला माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया ...
हॉर्मूझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, देशाच्या जवळपास निम्म्या कच्च्या तेल आणि एलपीजी आयातीचा पुरवठा याच मार्गाने होतो.
याशिवाय, इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, “बेकायदेशीर अटी” टाळल्यास संवाद शक्य असल्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.






