IPL 2026 SRH vs RR : विदर्भाच्या प्रफुल हिंगेचा कहर; राजस्थानचा विजयरथ रोखण्यात हैद्राबाद यशस्वी

सोमवार १३ एप्रिल रोजी हैद्राबाद आणि राजस्थान (IPL 2026 SRH vs RR) यांच्यात झालेल्या सामन्यात, हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने १९ व्या मोसमातील आपला दुसरा सामना जिंकत राजस्थानच्या विजयरथाला ब्रेक लावला. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो २४ वर्षीय गोलंदाज प्रफुल्ल हिंगे.


प्रफुल्ल हिंगेच्या रूपात आयपीएलमध्ये पुन्हा एकदा एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. प्रफुल्लने आपल्या पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी केली, जी दिग्गज गोलंदाजांनाही जमली नाही. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीकडून नेहमीप्रमाणेच (IPL 2026 SRH vs RR) चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण प्रफुल्ल हिंगेच्या जादुई चेंडूवर वैभव चक्क शून्यावर आऊट झाला. सलील अरोराने त्याचा झेल टिपला आणि प्रफुल्ल हिंगे या आपल्या विदर्भाच्या पोट्ट्याने राजस्थानला पहिला मोठा धक्का दिला. वैभवसारख्या आक्रमक फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर बाद करून प्रफुलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.



प्रफुल्ल एवढयावरच थांबला नाही. यर त्याने (IPL 2026 SRH vs RR) वैभवसह ध्रुव जुरेल आणि लुहान ड्री प्रिटोरियस यांनाही शून्यावर बाद केलं. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रफुल्लने असं काही करून दाखवलं जे मोठमोठया गोलंदाजांनाही जमलं नाही. आयपीएलमध्ये पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.


२४ वृषीय प्रफुल्लने विदर्भ संघातून उत्तम कामगिरी करत आयपीएल फ्रँचायझींचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं. त्याच्या उत्तम आणि सातत्यपूर्ण खेळामुळे त्याला आयपीएल (IPL 2026 SRH vs RR) लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबात, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी ट्रायलसाठी बोलावलं होतं. त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि नियंत्रण पाहून अखेर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात शामिल करून घेतलं. आणि प्रफुल्लने त्यांचा हा निणर्य सार्थकी ठरवला.


तुम्हाला काय वाटतं आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून आपल्याला अजून असे किती नवीन खेळाडू मिळतील? आम्हाला नक्की कळवा


Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील