IPL : बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले आहे. गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरातने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला केवळ १ धावेने पराभूत केल्यानंतर या सामन्यात मात्र दणदणीत विजय मिळवला. गुजरातने आता ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकल्याने त्यांचे ४ गुण झाले आहेत. गुजरातच्या या विजयात शुभमन गिल, जॉस बटलर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मोलाचा वाटा उचलला.


गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत लखनौच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखले. लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात लखनौने १६५ धावांचे लक्ष्य गुजरात समोर ठेवले होते. हे लक्ष्य गुजरातने १८.४ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सुरुवात चांगली केली होती. त्यांच्यात ४५ धावांची भागीदारी झालेली होती, पण ६ व्या षटकात सुदर्शनला १५ धावांवर दिग्वेश राठीने आवेश खानच्या हातून झेलाबाद केले. पण त्यानंतर गुजरातचा डाव गिलसह जॉस बटलरने समर्थपणे सांभाळला. या दोघांनी एकमेकांची साथ देताना चांगली भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. त्यांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पण त्यांची ८४ धावांची भागीदारी अखेर १५ व्या षटकात प्रिन्स यादवने तोडली. त्याने गिला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले. गिलने ४० चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने जॉस बटलरचा अडथळा दूर केला. बटलरचा अफलातून झेल एडेन मार्करमने घेतला. बटलरने ३७ चेंडूत ६० धावांची खेळी केली, ज्यात त्याने ११ चौकार मारले. पण तोपर्यंत गुजरातसमोरील समीकरण सोपे झाले होते. उर्वरित धावा वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १३ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या, तर राहुल तेवतियाने ८ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.


तत्पुर्वी, लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६४ धावा केल्या होत्या. लखनौकडून एडेन मार्करमने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली. पण बाकी कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. परंतु, ७ फलंदाजांनी १० धावांचा आकडा पार केला. त्यामुळे लखनौली १६० धावांचा टप्पा पार करता आला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. अशोक शर्माने २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील