Pocket Money Feature : गुगल पे कडून ‘पॉकेट मनी’ फीचर लॉन्च; आता मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सुरक्षित डिजिटल व्यवहार शक्य

गुगल पे ने 'पॉकेट मनी' नावाचे एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. ‘पॉकेट मनी’ हे फीचर भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ (एनपीसीआय) द्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘यूपीआय सर्कल’ या सुरक्षित तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे फीचर पूर्णपणे अधिकृत असून भारतीय डिजिटल पेमेंट्स प्रणालीच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा सायबर धोका नसून उलट व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठीच हे फीचर तयार करण्यात आले आहे.


गुगल पे हे 'यूपीआय सर्कल'च्या अंतर्गत काम करते. ‘यूपीआय सर्कल’ म्हणजे असे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती, ज्याच्याकडे स्वतःचे बँक खाते आहे, ती आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकते. या प्रक्रियेत प्राथमिक वापरकर्ता म्हणजे ज्याचे बँक खाते गुगल पेला जोडलेले आहे, तो संपूर्ण नियंत्रण ठेवतो. तर दुय्यम वापरकर्ता म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचे बँक खाते नसते, जसे की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा घरातील मदतनीस, ते या परवानगीच्या माध्यमातून व्यवहार करू शकतात.


या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील नियंत्रण यंत्रणा. प्राथमिक वापरकर्ता आपल्या गरजेनुसार खर्चाची मर्यादा ठरवू शकतो. उदाहरणार्थ, महिन्याला जास्तीत जास्त १५ हजार रुपयांची मर्यादा सेट करता येते. या मर्यादेत दुय्यम वापरकर्ता सहज व्यवहार करू शकतो. मात्र, जर ही मर्यादा सेट केली नसेल, तर प्रत्येक व्यवहारासाठी प्राथमिक वापरकर्त्याची मंजुरी आवश्यक असते. अशा वेळी प्रत्येक पेमेंटपूर्वी रिक्वेस्ट येते आणि यूपीआय पिन टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय एक रुपयाही खात्यातून जात नाही.


या फीचरमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे केवायसी प्रक्रिया. दुय्यम वापरकर्त्याची ओळख पटवणे बंधनकारक असल्याने कोणत्याही प्रकारच्या गैरवापराला आळा बसतो. ही माहिती केवळ बँक आणि संबंधित यंत्रणांकडे सुरक्षित राहते आणि भविष्यातील कोणत्याही चौकशीसाठी उपयोगी ठरते.


तसेच, एका प्राथमिक वापरकर्त्याला जास्तीत जास्त पाच दुय्यम वापरकर्ते जोडण्याची सुविधा दिली आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी हे फीचर उपयुक्त ठरते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फीचर मोठे वरदान ठरू शकते, कारण त्यांना डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेची हमी मिळते. त्याचप्रमाणे लहान मुलांना नियंत्रित स्वरूपात डिजिटल पेमेंट्सची सवय लावण्यासाठीही हे फीचर उपयोगी आहे.


तज्ञांच्या मते, सायबर फसवणूक टाळण्यासाठी या फीचरचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेली ‘यूपीआय सर्कल’ रिक्वेस्ट स्वीकारू नये आणि फक्त विश्वासू व ओळखीच्या व्यक्तींनाच जोडावे. तसेच कोणताही व्यवहार मंजूर करताना काळजीपूर्वक तपासणी करणे गरजेचे आहे.



जीपे वर 'पॉकेट मनी' कसे सुरू करावे?


१. GPay ॲप उघडा आणि Profile वर क्लिक करा.


२. तिथे UPI Circle निवडा आणि Set up pocket money वर क्लिक करा.


३. ज्या व्यक्तीला जोडायचे आहे, त्यांचे नाव निवडा किंवा त्यांचा QR कोड स्कॅन करा.


४. तुमच्या आवडीनुसार सेटिंग निवडा (मासिक मर्यादा किंवा प्रत्येक पेमेंटला मंजुरी).


५. दुय्यम वापरकर्त्याची माहिती भरा (उदा. त्यांच्याशी असलेले नाते आणि त्यांचा आधार क्रमांक)


६. शेवटी तुमचा UPI PIN टाकून प्रोसेस पूर्ण करा.

Comments
Add Comment

Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Jana Nayagan Leaked online : थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ

Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने