Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक


मुंबई (सचिन धानजी)


मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी या श्वानाच्या निर्बिजीकरणाचा अर्थात नसबंदीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षभरात ४५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी केली जाणार असून पुढील तीन वर्षांमध्ये एकूण १ लाख ३५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी करण्याचे लक्ष्य आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर ९ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या तीन वर्षांत नसबंदीवर तब्बल सुमारे २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या श्वान नियंत्रण विभागातर्फे सन १९९४ पासून भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्राणी जनन नियंत्रण (श्वान) कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सन १९९८ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहभागाने पुढे चालू ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ५२९ भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे.


मुंबईतील सन २०२४नुसारअसलेली भटक्या श्वानांची संख्या : ९०,७५७


त्यातील नसबंदी झालेल्या श्वानांची संख्या : ३३, ६७१


नसबंदी न झालेल्या नर आणि मादी श्वानांची संख्या :(नर २२,४४७, मादी ११,२२४)


भविष्यात वाढल्या जाणाऱ्या श्वानांची संख्या : ४,४८,९४७



कोणत्या संस्था आणि वर्षाला किती भटक्या श्वानांचे करणार निर्बिजीकरण :


द वेल्फेअर ऑफ स्ट्रेडॉग्ज-महालक्ष्मी (३००० श्वान)(वार्षिक खर्च ४६.५० लाख रुपये)


दि बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल,परळ ( १४०० श्वान)(वार्षिक खर्च २४.५० लाख रुपये)


इन डिफेन्स ऑफ एनिमल, देवनार ( ७,००० श्वान)(वार्षिक खर्च १.०८ कोटी रुपये)


अहिंसा मालाड ( ३४०० श्वान)(वार्षिक खर्च ५२.७० लाख रुपये)


उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, मुलुंड ( ९१८० श्वान)(वार्षिक खर्च १.६० कोटी रुपये)


मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ ( ५४० श्वान)(वार्षिक खर्च ०८.९१ लाख रुपये)


युथ ऑर्गनायझेशन इन डिफेंन्स ऑफ एनिमल ( ३७८० श्वान)(वार्षिक खर्च ६६. १५ लाख रुपये)


वेटरनली थेरपेटिक्स एंडोसर्जरी अँड मेडिसिन सोसायटी,मुलुंड ( ६४८० श्वान)(वार्षिक खर्च १ कोटी रुपये)


युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी , मालाड ( ५,१०० श्वान)(वार्षिक खर्च १.७८ कोटी रुपये)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार