Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना काल (शनिवार ११ एप्रिल २०२६) हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते.


आशा भोसले मागील सात दशकांपासून पार्श्वगायन करत होत्या. त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. चुनरिया या १९४८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून आशा भोसले यांच्या पार्श्वगायनाच्या कारकि‍र्दीला सुरुवात झाली. त्यांनी वीसपेक्षा जास्त भाषांमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियनसह एकूण २० भाषांमध्ये आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले.


चतुरस्त्र गायिका आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लता मंगेशकर त्यांची मोठी बहीण. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजाने कोट्यवधी रसिकांना वेड लावले. आशा भोसलेंनी दोन हजारांपेक्षा जास्त चित्रपटांतून गाणी गायली. अनेक अल्बमसाठीही त्यांनी गाणी गायली. आशा भोसलेंना २००८ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले होते.


रोमँटिक, गझल, पॉप, आयटम साँग अशा सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायली. आशा भोसलेंची आरडी बर्मन यांच्यासोबतची जोडी खूप गाजली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने ही त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत.


आशा भोसले यांनी अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी सांगितल्यानुसार अशा भोसले यांच्या राहत्या घरी म्हणजेच लोअर परेल येथील कासा ग्रांडेमध्ये उद्या (सोमवार १३ एप्रिल) सकाळी ११ वाजल्यापासून लोक त्यांचे अंतिम दर्शन घेऊ शकतील आणि दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


 
Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी