राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरची BCCI करणार चौकशी

गुवाहाटी : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवार १० एप्रिल रोजी झालेला सामना राजस्थानने सहा विकेट राखून जिंकला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने २६ चेंडूत ७८ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यावेळी घडलेल्या एका घटनेची बीसीसीआय चौकशी करणार आहे.


सामना सुरू असताना डगआऊटमध्ये वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसलेला टीमचा व्यवस्थापक (टीम मॅनेजर) रोमी भिंदर मोबाईल वापरत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भिंदरची कृती ही आयपीएलसाठीच्या खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्राशी संबंधित नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले.





टीमच्या व्यवस्थापकाला मोबाईल सोबत बाळगण्याची परवानगी आहे. पण डगआऊटमध्ये मोबाईलचा वापर नेमक्या कोणत्या कामासाठी झाला याचा तपास करावा लागेल. एखाद्या नियमाचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई केली जाईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.


चौकशीअंती दोषीवर काय कारवाई करावी याचा निर्णय सामनाधिकारी आणि आयपीएलचे भ्रष्टाचार विरोधी पथक यांच्या अहवालांवर अवलंबून आहे. पण डगआऊटमध्ये मोबाईलला बंदी आहे. व्यवस्थापकाने तिथे मोबाईल का नेला होता आणि त्याच्याकडून घडलेली कृती ही नियमाचे उल्लंघन आहे का हे चौकशी अहवालांवर अवलंबून असल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले.


राजस्थान रॉयल्सची टीम धावांचा पाठलाग करत होती त्यावेळी मोबाईलच्या वापराची घटना घडली आहे. शिवाय एक प्रतिक्रिया देताना वैभव सूर्यवंशीने भिंदर हा आपला एक मार्गदर्शक असल्याचे सांगितले आहे. वैभवच्या या वक्तव्याचा अर्थ तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली.


आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचे आतापर्यंत चार सामने खेळून झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळाल्यामुळे गुणतक्त्यात राजस्थान रॉयल्सची टीम आठ गुणांसह अव्वलस्थानी आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील