धक्कदायक! जन्मदात्या आईने 'या' कारणामुळे केली ६ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या

बीड : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं आईने प्रियकराच्या साथीनं चक्क ३ वर्षाच्या चिमुकल्याची पाण्यात बुडवून आणि भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुरुळीमधील खेड तालुक्यात घडली आहे. घटनेनंतर संबंधित महिलेनं या चिमुकल्याचा मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या मूळ गावी नेऊन हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, नातेवाइकांना संशय आल्यानं महिलेचे बिंग फुटले. यानंतर बीड पोलिसांनी ही माहिती दक्षिण महाळुंगे पोलिसांना दिली.


अवेज मेहबूब शेख (वय ६) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आई बसरीन मेहबूब शेख (वय २७, कुरुळी, मूळ धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) हिला अटक केली. तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, मूळ पुस, ता. अंबेजोगाई, जि. बीड) याच्यावरदेखील गुन्हा दाखल केला आहे. इसाक महमद शेख (वय ४९, पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला असून ही धक्कादायक घटना ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कुरुळीच्या खेड तालुक्यात घडली.


नेमकं काय घडलं ?


मुलाची आई बसरीन आणि तिचा प्रियकर कजेवाड यांनी ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री अवेज या चिमुकल्याला बाथरूममध्ये नेलं. त्याचं डोकं बादलीतील पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून या दोघांनी त्याची निघृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह धर्मापुरीला नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा बनाव केला. मात्र, नातेवाईकांना या संशय आल्यानं नातेवाइकांनी परळी ग्रामीण पोलिसांना याबद्दल माहिती दिली.


त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करण्यास सांगितलं. त्या अहवालात अवेजचा मृत्यू पाण्यात बुडाल्यानं झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी आई बसरीनची चौकशी केली असता तिनं मुलाची हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या महिलेचा प्रियकर राम कजेवाड हा फरार असून, पोलिस पथक त्याच्या त्याचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

Minister Ashish Shelar : नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग : नांदोस य

Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत

Pratap Sarnaik : स्कूल बसचे भाडे आता सरकार ठरवणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, पालकांना अलर्ट जाणार मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी

Women's Charter Adhikari : ‘मला महिला सचिव नको’; मंत्र्याच्या हट्टाचा महिला सनदी अधिकाऱ्याला अनुभव

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा खळबळजनक दावा मुंबई : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात