Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार


मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात भारतीय सल्लागार कंपन्यांना नेमण्याचे धोरण आखले असून यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयाची राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे सर्वात आधी अंमलबजावणी होत आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या देशी सल्लागार कंपनी यांच्या सल्लागार यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत कौशल्य विकास विभागाला पत्र ही लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असून कौशल्य विभाग याची पहिल्यांदा अंमलबजावणी करत असल्याचा आनंद असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त कौशल्य विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आदिवासी आणि दुर्गम भागात नियम शिथिल करून ३०० चौरस फूट जागेत महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास केंद्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासनाने समाविष्ट केलेल्या भारतीय सल्लागार कंपन्यांची सेवा घेणार आहे.


महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास केंद्र चालविण्यासाठी सल्लागार यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर, सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स, मुंबई, सेवा सहयोग फाऊंडेशन, पुणे आणि मुंबई येथील विवेक व्यासपीठ, मुंबई या सूचिबद्ध(एम्पॅनलमेंट)संस्थांना देण्यात यावे अशी सूचना कौशल्य विभागाला या पत्रात करण्यात आली आहे.


मंत्री लोढा यांनी सांगितले की, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवं भारताच्या संकल्पनेत स्वदेशीला विशेष महत्व दिले आहे. त्यामुळेच मेक इन इंडिया मुळे भारतीय उद्योजकांचा आत्मविश्वास वाढला असून भारतीय दर्जेदार उत्पादने जगभरात लोकप्रिय होत आहेत. हाच स्वदेशीचा नारा आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अमलात आणला आहे. विदेशी सल्लागार कंपन्या ऐवजी आता प्रशासनाच्या सहकार्यासाठी भारतीय सृजनशील तरुण पुढे येणार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने भारतीय तरुणांच्या संशोधनात भारतीयत्वाची सांगड दिसून येणार असून स्वदेशी सल्लागार कंपन्या जगभरात भरारी घेण्यासाठी सज्ज होणार आहेत.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी