Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका


मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याची चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवार यांनी, याच संप्रदायात शिरकाव केलेल्या 'अर्बन नक्षलवाद्यां'वरही कधीतरी बोलावे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी पवारांकडे काय योजना आहे आणि त्यांची संख्या किती, हे त्यांनी एकदा महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावे," असे आव्हान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना बन म्हणाले की, "वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा आणि भागवत धर्माची पताका उंचावणारा संप्रदाय आहे. या संप्रदायात धर्मांध शक्ती नाहीत. खरं तर औरंगजेब आणि अफजल खानाची वंशावळ हीच खरी धर्मांध शक्ती आहे. महाराष्ट्रात सध्या लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि लँड जिहादचे संकट उभे ठाकले असताना ज्येष्ठ नेते असूनही पवार यावर का बोलत नाहीत?"


काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, "राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असे वाटत असल्यानेच वडेट्टीवार अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत आहेत. खरात याने केलेल्या कृत्याबद्दल कारवाई करण्याची हिंमत काँग्रेस सरकारमध्ये झाली नसती. राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, म्हणूनच तत्काळ कारवाई झाली," असा दावा त्यांनी केला.



मुंबई महापालिकेत 'एआय'चा पहारा


मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाष्य करताना त्यांनी नालेसफाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. "महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही 'मुंबईकरांचे पहारेकरी' म्हणून काम करत आहोत. नालेसफाईतील घोटाळे रोखण्यासाठी आगामी काळात आवश्यक तिथे 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर महायुतीचा भर असेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास