Minister Ashish Shelar : नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ


सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे. आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.


माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.


यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले. विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.


यावेळी आमदार निलेश राणे, पुण्याच्या डी.ई.एस. नवलमल फिरोदिया, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, व्हिक्टर डांटस फाउंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर एफ. डांटस कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा मार्गज, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर उपस्थित होत्या.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आधार किट वाटप उपस्थित राहून सेवा केंद्राचे वितरण केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सांस्कृतिक विभाग अजय पाटील, दिग्दर्शक दिपक कदम, तहसीलदार सचिन पाटील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कट्टा येथील शतक महोत्सवी कट्टा पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले त्यांच्या हस्ते कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

Comments
Add Comment

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा

The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत

जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे

Pune : धरणांतील जलसाठ्यात घट, पाणी जपून वापरण्याचे निर्देश

राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Buldhana : पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली