Mumbai International Airport : २४ महिलांकडून ३० किलो सोने जप्त; विमानतळावर तपास यंत्रणांची मोठी कामगिरी

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांचे जवळपास ३० किलो सोने तस्करीच्या मार्गाने आणताना २४ महिलांना अटक करण्यात आली आहे.



DRIची गुप्त कारवाई


गुप्त माहितीच्या आधारे DRIने विशेष मोहीम राबवत या महिलांना ताब्यात घेतले. ‘ऑपरेशन’ अंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ३७.७४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.



जप्त करण्यात आलेला माल


या कारवाईत २५.१० किलो सोन्याच्या लड्या आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सर्व आरोपी महिलांना अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.



धक्कादायक माहिती समोर


तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, महिलांनी सोने अत्यंत कौशल्याने लपवले होते. काहींनी बुटांमध्ये, तर काहींनी कपड्यांच्या आत विशेष तयार केलेल्या पाऊचमध्ये सोने ठेवले होते. काही प्रकरणांमध्ये शरीरावर लपवण्याचे प्रकारही आढळले आहेत. या महिलांना सोने लपवण्याचे आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई एका संघटित टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.


अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र होणार आहे.

Comments
Add Comment

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Nashik MNC Forced Conversion Case : आता थेट 'एनआयए' आणि 'सीबीआय' करणार बड्या रॅकेटचा पर्दाफाश!

नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले.....

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा हवाई अपघात थोडक्यात टळला

- पायलटची गंभीर चूक; हेलिपॅडऐवजी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये लँडिंगचा प्रयत्न मुंबई : राज्याचे अन्न व नागरी

Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून