Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा हवाई अपघात थोडक्यात टळला

- पायलटची गंभीर चूक; हेलिपॅडऐवजी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये लँडिंगचा प्रयत्न


मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगबाबत पुरंदरमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच थरारक प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त खानवडी येथे आयोजित कार्यक्रमाला जात असताना, पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरवता चक्क वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवले. या प्रकारामुळे उपस्थित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतीज्योती महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ हेलिकॉप्टरने येणार होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खानवडी गावात त्यांच्या लँडिंगसाठी सर्व निकष पाळून सुरक्षित ठिकाणी हेलिपॅड तयार केले होते.


हेलिकॉप्टर खानवडीच्या आकाशात पोहोचल्यानंतर पायलटने खाली जागा शोधण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला कार पार्किंगची मोकळी जागा दिसली. पायलटने त्या जागेलाच हेलिपॅड समजले आणि थेट पार्किंगच्या दिशेने हेलिकॉप्टर खाली घेण्यास सुरुवात केली. गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरत असल्याचे पाहताच तिथे तैनात पोलिसांनी धावत जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.


पोलिसांची सतर्कता :

गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टरचे चाक टेकताच पोलिसांनी तात्काळ पायलटशी संपर्क साधून ही जागा अधिकृत हेलिपॅड नसल्याचे ओरडून सांगितले. आपली चूक लक्षात आल्यावर पायलटने तात्काळ पुन्हा इंजिनचा जोर वाढवला आणि हेलिकॉप्टर हवेत झेपावले. त्यानंतर, काही अंतरावर असलेल्या नियोजित आणि सुरक्षित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या सर्व प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसले तरी, काही काळ परिसरात प्रचंड गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या

PM Narendra Modi : शॉर्टकटचा मोह टाळा, मेहनत आणि संघर्षाचा मार्ग निवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेन-झी पिढीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे