Mira - Bhayanda Cylinder Blast : भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट; झोपडपट्टीला बेचिराख, तिघांचा मृत्यू

भाईंदर : मुंबईजवळील भाईंदर परिसरात सिलेंडर स्फोटाची घटना घडली असून परिसरात घबराट पसरली आहे. झोपडपट्टी भागात लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



अवैध साठ्यामुळे दुर्घटना?


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आला होता. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा आणि वाढलेले दर याचा फायदा घेत हा साठा केल्याचा संशय आहे.




नेमकी घटना कशी घडली?


इंद्रलोक परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. लोंढा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये ठेवलेल्या सिलेंडरना अचानक आग लागली आणि त्यानंतर एकामागून एक स्फोट झाले.



स्फोटांची मालिका आणि आगीचा फैलाव


या आगीत सुमारे २० ते ३० सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे आग वेगाने पसरली आणि आसपासच्या झोपड्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले.




जीवितहानी आणि जखमी


या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



अग्निशमन दल


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. घटनास्थळावरून सुमारे २६ ते २९ सिलेंडर आढळल्याचेही समोर आले आहे.


आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठा कसा करण्यात आला? , याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक