Nitin Gadkari : ई-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होऊ शकते - गडकरी

नवी दिल्ली : ई-20 (इथेनॉल) मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे. (Fuel Efficiency,) गडकरी यांनी पुढे म्हटले की, ई-20 मुळे काही जुन्या बीएस-3 वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते. भारत स्टेज (BS-III) वाहने प्रामुख्याने 2005 ते 2016 दरम्यान तयार करण्यात आली होती. हे भाग नियमित सर्व्हिसिंग दरम्यान सहजपणे बदलता येतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ई-20 मुळे वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही मोठा परिणाम होत नाही. या वाहनांच्या इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले. (Nitin Gadkari)



गडकरी यांनी स्पष्ट केले की, इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ई-20 इंधनावर एक अभ्यास केला होता. वाहनाचे मायलेज केवळ इंधनावर अवलंबून नसते, तर त्यावर ड्रायव्हिंगची शैली, रस्त्याची स्थिती, देखभाल आणि इतर घटकांचाही प्रभाव पडतो. याचा वापर जगभरात शंभर वर्षांहून अधिक काळापासून केला जात आहे. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शनिवारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर राहणार आहेत. या

OBC Reservation : केंद्रीय ओबीसी यादीत ३३ जातींसह सलमानी जातीच्या समावेशाची मागणी

ओबीसी महाराष्ट्र कृती समितीची दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी नवी दिल्ली :

Jaish-e-Mohammed Terrorist : पश्चिम बंगालमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे जप्त

बर्धमान : पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि जिल्हा पोलिसांनी संयुक्त

Russia-Ukraine War : भारतीय पीडितांच्या कुटुंबीयांना माहिती, मदत आणि न्याय मिळवून देण्याचे निर्देश

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नोकरीचे आमिष दाखवून रशियात पाठविण्यात आलेल्या आणि नंतर युद्धभूमीवर

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी

Hyderabad: मेटा इंडियाचे प्रमुखांसह सोशल मीडिया खात्यांविरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआय-आधारित आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी