Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते.


या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. मंत्री मा. जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली.



यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत मंत्री महोदयांनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले.


मंत्री महोदयांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मा. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.



संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक