Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास करणाऱ्या लाखो महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) महिलांच्या सुरक्षेसाठी 'सखी' हा विशेष व्हॉट्सअ‍ॅप उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून महिला प्रवासी थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना आता अवघ्या काही मिनिटांत मदत मिळणार आहे.


चर्चगेट ते डहाणू पर्यंत एकूण ११ व्हॉट्सअॅप ग्रूप्स तयार करण्यात आले असून या ग्रूपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक करत आहेत. महिला प्रवाशाने छेडछाड, चोरी किंवा पुरुषांच्या घुसखोरीबाबत फोटो आणि स्थानकाचं नाव ग्रूपवर टाकल्यास, पुढच्या एक-दोन स्थानकांतच आरपीएफचे जवान मदतीसाठी डब्यात हजर होतील.


या उपक्रमात आतापर्यंत १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी सहभागी झाल्या असून केवळ तांत्रिक मदतच नव्हे तर आरपीएफनं प्रत्यक्ष कारवाईचा बडगाही उभारला आहे. गेल्या ६ महिन्यांत महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रेल्वेची '१३९' ही हेल्पलाईन सेवा सुरू असली, तरी व्हॉट्सअॅप ग्रूपमुळे फोटो आणि लोकेशन शेअर करणं फार सोपं झाल्यानं गुन्हेगारांना पकडणं अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे या नवीन उपक्रमामुळे आता लोकलमध्ये प्रवास करताना महिलांना घाबरण्याची गरज नाही.

Comments
Add Comment

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय